भारताने हमासवर बंदी घालावी! इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांची मागणी

भारतातील संबंधित विभागांना आम्ही यापूर्वीच ही विनंती केली आहे,’’ असे गिलॉन यांनी सांगितले
भारताने हमासवर बंदी घालावी! इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांची मागणी

नवी दिल्ली : भारताने हमासला दहशतवादी संघटना घोषित करून तिच्यावर बंदी घालावी, अशी मागणी इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांनी केली. बुधवारी नवी दिल्लीत पत्रकारांबरोबर वार्तालाप करताना गिलॉन यांनी ही मागणी केली.

‘‘हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी हल्ला केला, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताबडतोब हमासचा निषेध केला. भारताने या संघर्षात इस्रायलला ठोस पाठिंबा व्यक्त केला. आज भारत हा जगातील एक मोठी नैतिक शक्ती आहे. भारताच्या मताला किंमत आहे. भारताने आम्हांला १०० टक्के सहकार्य केले आहे. आता वेळ आली आहे की, भारताने हमासला दहशतवादी संघटना घोषित करून तिच्यावर बंदी घालावी. भारतातील संबंधित विभागांना आम्ही यापूर्वीच ही विनंती केली आहे,’’ असे गिलॉन यांनी सांगितले.

हमासला नष्ट करण्याच्या इस्रायलच्या निर्धाराचा गिलॉन यांनी पुनरुच्चार केला. इस्रायलच्या अस्तित्वासाठी हमासला संपवणे भाग असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in