अंतराळ मोहिमांसाठी भारताला अंतराळवीरांच्या समूहाची गरज! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

भारताच्या गगनयान मोहिमेसाठी पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा अंतराळ अनुभव नक्कीच मौल्यवान ठरेल. भारताला अंतराळ मोहिमेसाठी ४० ते ५० अंतराळवीरांच्या गटाची आवश्यकता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
अंतराळ मोहिमांसाठी भारताला अंतराळवीरांच्या समूहाची गरज! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
Published on

नवी दिल्ली : भारताच्या गगनयान मोहिमेसाठी पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा अंतराळ अनुभव नक्कीच मौल्यवान ठरेल. भारताला अंतराळ मोहिमेसाठी ४० ते ५० अंतराळवीरांच्या गटाची आवश्यकता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अंतराळवीर शुक्ला यंनी मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना ॲक्सिओम-४ मिशनसाठी नेलेला तिरंगा भेट दिला आणि अंतराळातून पृथ्वीचे काढलेले फोटो दाखवले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताच्या गगनयान मोहिमेसाठी शुक्ला यांचा अंतराळ अनुभव नक्कीच मौल्यवान ठरेल. शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला अंतराळ मोहिमेसाठी ४० ते ५० अंतराळवीरांच्या गटाची आवश्यकता आहे.

मोदींनी एक्सवर पोस्ट शेअर करत या बैठकीची माहिती दिली. ते म्हणाले, शुभांशू शुक्ला यांच्याशी चांगला संवाद झाला. शुंभाशू शुक्ला यांचा अंतराळातील अनुभव, अंतराळ क्षेत्रातील विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच गगनयान मोहिमेबाबत भारताच्या आकांक्षा अशा विविध विषयांवर आम्ही चर्चा केली. भारताला शुभांशू शुक्ला यांचा अभिमान वाटतो.

logo
marathi.freepressjournal.in