
ड्रोन प्रदर्शनाने मी प्रभावित झालो आहे. २०३० पर्यंत भारत ड्रोन हब बनेल. आज मी ज्या प्रत्येक स्टॉलवर गेलो, तिथे सर्वजण अभिमानाने हे मेक इन इंडिया असल्याचे सांगत होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ही ऊर्जा भारतातील रोजगार निर्मितीच्या मोठ्या क्षेत्राची क्षमता दर्शवते. आठ वर्षांपूर्वीचा हा काळ होता, जेव्हा आम्ही भारतात सुशासनाचे नवे मंत्र राबवायला सुरुवात केली होती, असे ते म्हणाले. “रोजगार निर्मितीसाठी हे क्षेत्र मोठ्या संधी उपलब्ध करत आहे असे ते म्हणाले."
पंतप्रधानांच्या हस्ते दोन दिवसीय ड्रोन फेस्टिव्हल २०२२ चे उद्घाटन शुक्रवारी दिल्लीतील प्रगती मैदानावर झाले. यावेळी ते बोलत होते. त्यांनी प्रदर्शनाची पाहणीही केली. त्यांनी किसान ड्रोन चालकांशी संवाद साधला. खुली ड्रोन प्रात्यक्षिके पाहिली आणि ड्रोन प्रदर्शन केंद्रातील स्टार्टअप्सशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, गिरीराज सिंह, ज्योतिरादित्य सिंधिया, अश्विनी वैष्णव, मनसुख मांडविया, भूपेंद्र यादव, अनेक राज्यमंत्री आणि ड्रोन उद्योगातील प्रमुख तसेच उद्योजक उपस्थित होते. पंतप्रधानांनी १५० ड्रोन चालकांना पायलट प्रमाणपत्रेही दिली.
दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सरकारी अधिकारी, विदेशी मुत्सद्दी, सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, सार्वजनिक उपक्रम, खाजगी कंपन्या आणि ड्रोन स्टार्टअपसह १६००हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान म्हणाले.