भारत अमेरिकेकडून शस्त्र खरेदी बंद करणार? संरक्षण मंत्र्यांचा अमेरिकन दौरा रद्द

अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर भारताने त्याबाबत आता ताठर भूमिका घेतली आहे. अमेरिकेकडून भारताने शस्त्र खरेदी बंद केल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे पुढील आठवड्यात संरक्षण करारासाठी अमेरिकेत जाणार होते. मात्र, त्यांनी हा दौराही रद्द केला आहे.
भारत अमेरिकेकडून शस्त्र खरेदी बंद करणार? संरक्षण मंत्र्यांचा अमेरिकन दौरा रद्द
Photo : X
Published on

नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर भारताने त्याबाबत आता ताठर भूमिका घेतली आहे. अमेरिकेकडून भारताने शस्त्र खरेदी बंद केल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे पुढील आठवड्यात संरक्षण करारासाठी अमेरिकेत जाणार होते. मात्र, त्यांनी हा दौराही रद्द केला आहे.

‘रॉयटर्स’ने आपल्या अहवालात तीन भारतीय अधिकाऱ्यांचा हवाला देत हे वृत्त दिले आहे. त्यात दावा केला आहे की, ‘टॅरिफ’ वादाच्या पार्श्वभूमीवर भारत अमेरिकेकडून विमान व शस्त्रास्त्र खरेदी थांबवणार आहे..

अधिकाऱ्यांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले की, शस्त्रास्त्रे खरेदी करार रोखण्यासाठी अजून लेखी आदेश जारी झालेला नाही. टॅरिफ वाद सोडवण्यासाठी याबाबत निर्णय घेतला जाईल. भारत सरकारची अमेरिकेसोबत चर्चा सुरूच राहील. टॅरिफ व द्विपक्षीय संबंधातील स्पष्टतेनंतर कराराचा निर्णय घेतला जाऊ शकतो. संरक्षण करार तेव्हाच पुढे जाईल.

भारताची कॉम्बॅट वाहन खरेदी

जनरल डायनेमिक्स ॲँड सिस्टम्सच्या स्ट्रायकर कॉम्बॅट व्हेईकल्स आणि रेथियॉन व लॉकहीड मार्टिनच्या जॅवलिन रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र भारत खरेदी करणार होता. ट्रम्प आणि मोदी यांनी यंदा या खरेदीबाबत व संयुक्त उत्पादन करण्याबाबत घोषणा केली होती.

सरकारने वृत्त फेटाळले

दरम्यान, अमेरिकेसोबत संरक्षण करारास स्थगिती दिल्याचे वृत्त भारत सरकारने फेटाळले आहे. ही माहिती ‘एएनआय’ने संरक्षण खात्यातील सूत्रांच्या हवाल्याने दिली. हे वृत्त चुकीचे व खोटे आहे. अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदी पहिल्यासारखीच सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in