आगळीक केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील; भारताचा पाकिस्तानला दम

पाकिस्तानी नेत्यांकडून गेल्या तीन ते चार दिवसांत भारतविरोधी वक्तव्ये केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारताने गुरुवारी पाकला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. 'पाकने आगळीक केल्यास त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील', असा सज्जड दम भारताने पाकला दिला आहे.
आगळीक केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील; भारताचा पाकिस्तानला दम
Published on

नवी दिल्ली : पाकिस्तानी नेत्यांकडून गेल्या तीन ते चार दिवसांत भारतविरोधी वक्तव्ये केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारताने गुरुवारी पाकला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. 'पाकने आगळीक केल्यास त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील', असा सज्जड दम भारताने पाकला दिला आहे. भारताच्या परराष्ट्र खात्याने सांगितले की, भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी व आपले अपयश झाकायला पाकिस्तानी नेते ही वक्तव्ये जाणूनबुजून करत आहेत. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, पाकिस्तानकडून सातत्याने भारताविरोधात गरळ ओकली जात आहे. युद्ध भडकवणारी विधाने केली जात आहेत. आपले अपयश झाकायला पाक नेतृत्व वारंवार भारतविरोधी वक्तव्ये करत आहे. पाकिस्तानी नेत्यांनी आपल्या जिभेवर संयम ठेवावा. त्यांनी कोणतीही आगळीक केल्यास त्याचे परिणाम घातक होतील, असा इशारा त्यांनी दिला.

भारत-अमेरिका संबंध परस्पर सामंजस्यावर आधारित

भारत-अमेरिका संबंध हे परस्पर सामंजस्यावर आधारित असून ते भविष्यात अधिक मजूबत होतील. दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य मजबूत आहे. गेल्या काही वर्षांपासून ते अधिक दृढ झाले आहे. या महिन्यात संरक्षण धोरण ठरवणारे शिष्टमंडळ अमेरिकेतून भारतात येणार आहे. दोन्ही देशांमध्ये अलास्कात या महिन्यात संयुक्त लष्करी सराव होणार आहे, असे जयस्वाल यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in