‘त्या’ ८ जणांच्या शिक्षेविरोधात भारत अपील करणार

आमच्याकडे ६० दिवसांचा वेळ आहे. आम्ही कतारच्या सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहोत. या प्रकरणी कायदा पथक काम करत आहे
‘त्या’ ८ जणांच्या शिक्षेविरोधात भारत अपील करणार

नवी दिल्ली : कतारच्या तुरुंगात अटकेत असलेल्या भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांची तेथील कोर्टाने फाशीची शिक्षा रद्द केली. आता त्यांना तुरुंगवास झाला आहे. या शिक्षेविरोधात भारत सरकार तेथील न्यायालयात अपील करणार आहे. परराष्ट्र खात्याचे नवीन प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले की, कतारच्या कोर्ट ऑफ अपीलने २८ डिसेंबरला आपला निकाल दिला होता. त्यात त्यांनी ८ जणांच्या फाशीवर स्थगिती दिली. आमच्या कायदेशीर पथकाकडे कोर्टाची ऑर्डर आहे. आमच्याकडे ६० दिवसांचा वेळ आहे. आम्ही कतारच्या सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहोत. या प्रकरणी कायदा पथक काम करत आहे, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in