नवी दिल्ली : भारताने व्हेनेझुएला या दक्षिण अमेरिकेतील देशाकडून पुन्हा तेल खरेदी करण्याची घोषणा केली. भारत सरकारतर्फे व्हेनेझुएलाशी तेल खरेदीबाबत चर्चा सुरू आहे.
तेलमंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, भारताच्या अनेक तेलशुद्धीकरण कारखाने तेल शुद्धीकरणास पूर्ण फिट आहेत. ज्या देशांवर निर्बंध नाहीत, त्या कोणत्याही देशाकडून भारत ग्राहक म्हणून तेल खरेदी करण्यास इच्छुक आहे.
भारतातील तेल शुद्धीकरण कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडियन ऑईल व एचपीसीएल-मित्तल एनर्जी यांनी व्हेनेझुएलाच्या तेलाचे जहाज बुक केले आहेत. बीपीसीएल कंपनीही लॅटिन अमेरिकन देशाकडून तेल आयात करण्याचा विचार करत आहे. अमेरिकेने ऑक्टोबरमध्ये व्हेनेझुएलावरील निर्बंध कमी केले होते.