संघर्षाची सुरुवात व शेवट कसा करायचा हे भारताकडून शिकावे! हवाई दलप्रमुख ए.पी. सिंग यांचे प्रतिपादन

संघर्ष कसा सुरू करावा व तो लवकर कसा थांबवावा हे जगाने भारताकडून शिकावे, असे प्रतिपादन भारताचे हवाई दलप्रमुख ए. पी. सिंग यांनी सांगितले.
संघर्षाची सुरुवात व शेवट कसा करायचा हे भारताकडून शिकावे! हवाई दलप्रमुख ए.पी. सिंग यांचे प्रतिपादन
Photo : X (@NetramDefence)
Published on

नवी दिल्ली : संघर्ष कसा सुरू करावा व तो लवकर कसा थांबवावा हे जगाने भारताकडून शिकावे, असे प्रतिपादन भारताचे हवाई दलप्रमुख ए. पी. सिंग यांनी सांगितले.

भाषण करताना एअर चीफ मार्शल सिंग म्हणाले की, या मोहिमेसाठी सैन्यदलाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते आणि राजकीय नेतृत्वाने कोणतीही बंधने घातली नव्हती. ७ ते १० मेदरम्यान पाकिस्तानसोबत झालेल्या संघर्षात हवाई शक्तीचे वर्चस्व दिसले. एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली निर्णायक ठरली, कारण तिच्या पल्ल्यामुळे आणि सामर्थ्यामुळे पाकिस्तान गोंधळून गेला. पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांचे नुकसान झाले. त्यांची बऱ्याच प्रमाणात पायाभूत सुविधा, रडार, नियंत्रण आणि समन्वय केंद्रे, हँगर्स, विमान यांचे नुकसान झाले, असे ते म्हणाले.

२०१९ च्या बालाकोट हवाई हल्ल्याच्या परिणामकारकतेबद्दल पुरावे मागणाऱ्यांवरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली आणि 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानला झालेल्या नुकसानीचे ग्राफिक तपशील दाखवले.

सिंग म्हणाले की, संघर्ष थांबवणे हा या कारवाईतील एक महत्त्वाचा पैलू होता. कारण जगभरातील अनेक युद्धे खूप काळ चालत आहेत. भारताने पाकिस्तानविरुद्ध लष्करी मोहीम पुढे सुरू ठेवायला हवी होती हे मत त्यांनी नाकारले.

आम्ही ऐकले लोक म्हणत होते की, आणखी थोडे युद्ध करायला हवेत होते. आम्ही युद्ध खूप लवकर थांबवले. होय, पाकिस्तानला मागे टाकले होते. यात शंका नाही, पण आमची उद्दिष्टे काय होती? आमचे उद्दिष्ट दहशतवादविरोधी होते, असे ते म्हणाले.

आम्हाला त्यांना मारायचे होते. आम्ही ते केले. मग आमची उद्दिष्टे पूर्ण झाली असतील तर संघर्ष का चालू ठेवावा ? कोणतेही युद्ध थांबवले नाही तर मोठी किंमत मोजावी लागते, असे ते म्हणाले.

एअर चीफ मार्शल सिंग यांनी सांगितले की, कारवाई सुरू ठेवल्यास "पुढील संघर्षासाठी आपली तयारी प्रभावित झाली असती. त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर झाला असता. देशाच्या प्रगतीवर परिणाम झाला असता," असे ते म्हणाले.

युद्धाची उद्दिष्ट्ये विसरली जात आहेत

रशिया-युक्रेन युद्धासह अनेक सुरू असलेल्या संघर्षांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की जग युद्ध सुरू करताना उद्दिष्टे विसरत आहे. आता त्यांचे ध्येय बदलले आहे. अहंकार मध्ये येत आहेत आणि म्हणूनच मला वाटते जगाने भारताकडून शिकले पाहिजे की संघर्ष कसा सुरू करावा आणि कसा लवकर थांबवावा, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in