भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर काश्मीरमध्ये कोसळले ; जीवितहानी नाही

खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा, असे बोलले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात ढगाळ आणि पाऊस
भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर काश्मीरमध्ये कोसळले ; जीवितहानी नाही

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील मारवाह तालुक्यातील मचना गावाजवळ लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. अपघात झाला तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर अपघातात पायलटला किरकोळ दुखापत झाली आहे.
"जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवारजवळ लष्कराचे AHL ध्रुव हेलिकॉप्टर कोसळले आहे. पायलट जखमी झाले असले तरी ते सुरक्षित आहेत. 

भारतीय लष्कराचे ALH ध्रुव हेलिकॉप्टर कसे कोसळले? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा, असे बोलले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात ढगाळ आणि पाऊस पडत आहे. त्यामुळे खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in