इंडियन आर्मी क्विझ २०२३ 

भारतातील ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित
इंडियन आर्मी क्विझ २०२३ 

नवी दिल्‍ली : भारतीय लष्कराने गुरुवारी दिल्ली छावणीतील माणेकशॉ सेंटरमध्ये ‘बॅटल ऑफ माइंड्स’- इंडियन आर्मी क्विझ २०२३ चे आकर्षक लोगोसह अनावरण केले. कारगिल विजय दिवस साजरीकरणाच्या २५ व्या वर्षाची सुरूवातीची घोषणा करण्‍यासाठी ही प्रश्नमंजुषा स्पर्धा कारगिल युद्धात भारतीय सशस्त्र दलांच्या विजयोत्‍सवानिमित्त आयोजित केली होती.

या आर्मी क्विझमुळे तरुणांमध्ये कुतूहलता आणि शिकण्याची भावना जागृत करून भावी नेते घडवण्याचा देखील उद्देश आहे. या कार्यक्रमाला लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार उपस्थित होते. प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या लोगोचे अनावरण एडब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यूएच्‍या अध्‍यक्ष अर्चना पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. परमवीर चक्र पुरस्कार विजेते सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) योगेंद्र सिंह यादव (निवृत्त) आणि सुभेदार मेजर संजय कुमार, तसेच भारतातील ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in