इंडियन कॅन्सर सोसायटीचे 'राइज अगेन्स्ट कॅन्सर' मोबाईल ॲप

कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात एक शक्तिशाली शस्त्र असलेल्या मेड इन इंडिया ॲपचे पहिल्या टप्प्यात एक लाख भारतीयांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे.
इंडियन कॅन्सर सोसायटीचे 'राइज अगेन्स्ट कॅन्सर' मोबाईल ॲप
PM

मुंबई : भारतातील सर्वात मोठी कर्करोगविरोधी एनजीओ असलेल्या इंडियन कॅन्सर सोसायटीने जागतिक औचित्य साधून 'राइज अगेन्स्ट कॅन्सर' मोबाईल ॲपचे उद्घाटन केले. राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर आणि रोश प्रोडक्ट्स ( इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने या मेड इन इंडिया ॲपचे उद्दिष्ट त्रुटी दूर करणे, जागरूकता वाढवणे आणि कर्करोगमुक्त भविष्यासाठी विविध समुदायातील लोकांना एकत्र करणे असे आहे.

तसेच कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात एक शक्तिशाली शस्त्र असलेल्या मेड इन इंडिया ॲपचे पहिल्या टप्प्यात एक लाख भारतीयांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे. कर्करोगाबाबत अचूक माहिती देणे आणि समुपदेशन करून या आजाराचे प्राथमिक स्तरावर निदान करणे तसेच उपचार देऊन तो बरा करणे, असा इंडियन कॅन्सर सोसायटीचा प्रयत्न असणार आहे. व्यवस्थापकीय समितीच्या वतीने, हिंदी, इंग्रजी, कन्नड, मराठी आणि बंगाली या पाच भाषांमध्ये उपलब्ध असलेले हे वैशिष्ट्यपूर्ण ॲप सुरू करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आगामी टप्प्यांमध्ये हे ॲप आणखी भारतीय भाषांमध्ये उपलब्ध केले जाणार आहे, असे इंडियन कॅन्सर सोसायटीच्या- मुंबई, नॅशनल मॅनेजिंग ट्रस्टी उषा थोरात यांनी सांगितले. राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरचे सीईओ डी. एस. नेगी म्हणाले, आम्ही कर्करोगाविरुद्धच्या लढ्यासाठी वचनबद्ध असून, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व ओळखून हे ॲप सुरू केल्याबद्दल आयसीएस टीमचे कौतुक करतो. हे ॲप नाविण्यपूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करणाऱ्या राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरमधील आमच्या कार्याशीच नाते सांगते. याबरोबरच लोकांना रोगाविषयी ज्ञान देऊन सशक्त करणे आणि कर्करोग प्रतिबंधाच्या प्रयत्नांना अधिक सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in