दहशतवाद्यांकडून मालीत ३ भारतीयांचे अपहरण; परराष्ट्र मंत्रालय, दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात

पश्चिम आफ्रिकेतील माली देशामध्ये एक सिमेंटच्या कारखान्यात काम करणाऱ्या तीन भारतीय नागरिकांचे ‘अल-कायदा’शी संबंधित दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचे वृत्त आहे. भारत सरकारने गुरुवारी या वृत्ताला दुजोरा दिला असून आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी पावले उचलली आहेत.
दहशतवाद्यांकडून मालीत ३ भारतीयांचे अपहरण; परराष्ट्र मंत्रालय, दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात
Published on

माली : पश्चिम आफ्रिकेतील माली देशामध्ये एक सिमेंटच्या कारखान्यात काम करणाऱ्या तीन भारतीय नागरिकांचे ‘अल-कायदा’शी संबंधित दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचे वृत्त आहे. भारत सरकारने गुरुवारी या वृत्ताला दुजोरा दिला असून आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी पावले उचलली आहेत.

माली देशाच्या अनेक भागांमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. याच दरम्यान भारतीय नागरिकांचे अपहरण झाले. भारताने याबाबत चिंता व्यक्त करत माली सरकारला त्यांच्या सुटकेसाठी खबरदारी घेण्यास सांगितले आहे. मालीमध्ये भारतीय नागरिकांच्या झालेल्या अपहरणाबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने माली सरकारला सुटकेसाठी पावले उचलण्याची विनंती केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, कायसमध्ये डायमंड सिमेंट कारखान्यात भारतीय लोक काम करत होते. मंगळवारी दहशतवाद्यांनी कारखान्यावर हल्ला केला. या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांना ताब्यात घेतले. भारत सरकारकडून मालीशी याबाबत चर्चा केली असून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पावले उचलण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनांनी घेतलेली नाही.

सातत्याने संपर्कात

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, बामाकोमधील भारतीय दूतावास स्थानिक अधिकारी, पोलीस आणि डायमंड सिमेंट कारखान्याच्या व्यवस्थापनाशी सतत संपर्कात आहे. दूतावास अपहरण झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांशीही बोलत आहे. अपहरण झालेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित आणि लवकर सोडवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in