भारतीय चलन रुपया कोसळला नाही - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

राज्यसभेत माहिती देताना सीतारामन म्हणाल्या की, भारतीय रिझर्व्ह बँक सतत भारतीय चलनावर देखरेख करत आहे
भारतीय चलन रुपया कोसळला नाही - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यानंतर चिंता व्यक्त झाली असली तरी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी भारतीय चलन रुपया कोसळला नाही. गेले काही दिवस त्याची घसरण ही नैसर्गिक बाब आहे.

राज्यसभेत माहिती देताना सीतारामन म्हणाल्या की, भारतीय रिझर्व्ह बँक सतत भारतीय चलनावर देखरेख करत आहे आणि जर दोलायमान अवस्था असेल तर हस्तक्षेप केला जातो. भारतीय रुपयाची कितपत घसरण झाली म्हणजे रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करावा असे काही निश्चित नाही. मात्र, निर्णय घेण्यास त्यांना मोकळीक आहे, असे सीतारामन यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. यूपीए सरकारच्या काळात २००४ ते २०१४ या कालावधीत रुपया १० ते १२ टक्के घसरला होता तर एनडीए सरकारच्या काळात २०१४ पासून डॉलरच्या तुलनेत रुपया फार कमी घसरला आहे. अमेरिकन डॉलरचे मूल्य ४.५४ टक्के वाढले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in