वृत्तसंस्था/नवी दिल्ली : भारतीय हॉटेल उद्योगाने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ७-९ टक्के महसूल वाढ अपेक्षित असून ही वाढ या दशकातील उच्चांकी राहण्याची शक्यता आहे, असे रेटिंग एजन्सी ICRA ने मंगळवारी ही माहिती दिली.
इक्राने एका निवेदनात म्हटले आहे की, निवडणुकीचा कालावधी असला तरी विवाहसोहळा आणि व्यावसायिक प्रवासासह, प्रोत्साहन, परिषदा आणि प्रदर्शने बैठकांमधून मागणी राहणार आहे. त्याचबरोबर आध्यात्मिक पर्यटन आणि टियर-II शहरे देखील आर्थिक वर्ष २०२५ मध्ये अर्थपूर्ण योगदान देतील, अशी अपेक्षा आहे.
इक्राने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये देशांतर्गत पर्यटन ही प्रमुख मागणी आहे आणि नजीकच्या काळात ती तशीच राहण्याची शक्यता आहे. परदेशी पर्यटकांचे आगमन (एफटीए) अद्याप प्री-कोविड स्तरावर आलेले नाही आणि ही सुधारणा जागतिक आर्थिक वातावरणावर अवलंबून असेल. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये बाजारपेठांमध्ये मागणी मजबूत राहण्याची अपेक्षा आहे, कारण ग्राहकांच्या भावना उत्तम राहिल्या आहेत आणि कॉर्पोरेट कामगिरी स्थिर आहे, असे इक्रा लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि सेक्टर हेड कॉर्पोरेट रेटिंग्स विनुता एस यांनी सांगितले.
इक्राने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२४ आणि आर्थिक वर्ष २०२५ मध्ये संपूर्ण भारतातील प्रीमियम हॉटेलची व्यवसाय, उलाढाल दशकातील उच्च (सुमारे) ७०-७२ टक्क्यांपर्यंत असेल आणि आर्थिक वर्ष २०२३ मधील ६८-७० टक्क्यांनंतर सावरल्याचे दिसून येईल.