सर्वात मोठा ड्रग्जचा साठा जप्त: तब्बल ३३०० किलो अंमलीपदार्थ ATS, एनसीबी, नौदलाच्या संयुक्त कारवाईत पकडले

भारतीय उपखंडातील अंमली पदार्थांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती आहे.
3300 Kg drugs seized
3300 Kg drugs seized

गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर एटीएस, नार्कोट्रिक कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे कारवाई करत आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. समुद्रात फिरणाऱ्या संशयास्पद बोटीतून कोट्यावधी रुपयांचं अंमलीपदार्थ जप्त करण्यात आलं आहे. तब्बल ३३०० किलो वजनी ड्रग्जचा साठा पकडण्यात आला असून ५ विदेशी तस्करांना अटक करण्यात आलीय. भारतीय उपखंडातील अंमली पदार्थांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती आहे.

भारतीय तटरक्षक दल, एटीएस आणि एनसीबीने ड्रग्जचा साठा पकडण्यासाठी अरबी समुद्रात सापळा रचला होता. या ड्रग्जमध्ये चरस (३०८९ किलो), मेथॅम्फेटामाइन (१५८ किलो), आणि मॉर्फिनचा (२५ किलो) समावेश असल्याची माहिती समोर आलीय. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बोटीतून समुद्रीमार्गे ड्रग्जची तस्करी करणाऱ्या ५ विदेशी नागरिकांना अटक करण्यात आलीय. हे पाच आरोपी इराणी किंवा पाकिस्तानी असल्याचा संशय एनसीबीला आहे. या ओरपींकडे देशाचे नागरिकत्व दर्शवणारे कोणतेही कागदपत्रे नाहीत, अशी माहिती एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिलीय.

P8I LRMR विमानाच्या इनपुटच्या आधारे, समुद्रीमार्गे ड्रग्जची तस्करी करण्याऱ्या जहाजाला संशयास्पदरित्या थांबवण्यात आलं. गुजरात एटीएस, एनसीबी आणि भारतीय नौदलाने सर्वात मोठी संयुक्त कारवाई केली आहे. ड्रग्जचा साठा असलेली बोट आणि त्यामध्ये असलेल्या तस्करांना भारतीय बंदरात कायदा अंमलबजावणी एजन्सीकडं सुपूर्द केलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in