भारतीय नौदल बांधणार ‘एआयपी’ तंत्रज्ञानाने पाणबुड्या; ६० हजार कोटींचा प्रकल्प!
ANI

भारतीय नौदल बांधणार ‘एआयपी’ तंत्रज्ञानाने पाणबुड्या; ६० हजार कोटींचा प्रकल्प!

भारतीय नौदलाच्या पाणबुडी ताफ्याचे आधुनिकीकरण करण्याचा भाग म्हणून ६० हजार कोटींचा करार झाला आहे.

धर्मेश ठक्कर/मुंबई : भारतीय नौदलाच्या पाणबुडी ताफ्याचे आधुनिकीकरण करण्याचा भाग म्हणून ६० हजार कोटींचा करार झाला आहे. या अंतर्गत सहा स्टेल्थ तंत्रज्ञानाने सज्ज पाणबुड्या बांधल्या जाणार आहेत. त्यात एअर इंडिपेंडंट प्रॉप्लशन तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे पाणबुडी अधिक काळ पाण्यात राहण्यास मदत मिळणार आहे. या पाणबुडीच्या चाचण्या माझगाव डॉकमध्ये सुरू झाल्या आहेत.

भारतीय नौदलाने ‘प्रोजेक्ट ७५’ अंतर्गत डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या बांधण्याचे ठरवले आहे. या पाणबुडीत इंधनाचे सेल असणार असून त्यात एआयपी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या नवीन पाणबुड्या जुन्या पाणबुड्यांची जागा घेणार आहेत.

भारतीय नौदलाच्या आधुनिकीकरणाचा भाग म्हणून १६ पारंपरिक पाणबुड्या नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज केल्या जाणार आहेत. तसेच सहा कोलावरी श्रेणीच्या फ्रेंच स्कॉर्पिन पाणबुड्यांची बांधणी माझगाव डॉकमध्ये केली जाणार आहे.

भारतीय नौदलासाठी ‘एआयपी’ तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे. या तंत्रज्ञानामुळे पाणबुडी अधिक काळ पाण्यात राहू शकते.

एआयपी तंत्रज्ञान म्हणजे काय?

>भारतीय नौदलासाठी ‘एआयपी’ तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे. या तंत्रज्ञानामुळे पाणबुडी अधिक काळ पाण्यात राहू शकते.

> पारंपरिक पाणबुडीला सातत्याने बॅटरी रिचार्ज करायला वर यावे लागते. त्यामुळे शत्रूला पाणबुडीचा थांगपत्ता लागण्याचा धोका असतो.

> हिंदी महासागरात चीनचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळेच भारतीय नौदलाचे आधुनिकीकरण हाती घेतले आहे. तसेच पाकिस्तानला चीनकडून आठ ‘हँगोर’ दर्जाच्या पाणबुड्या मिळणार आहेत. पाकिस्तानला स्टेल्थ पाणबुड्या पुरवणे म्हणजे भारतावर दबाव आणण्याचा एक भाग आहे.

> चीनच्या हँगोर दर्जाच्या पाणबुड्यात ‘एआयपी’ ही यंत्रणा असते. भारताच्या कलावरी दर्जाच्या स्कॉर्पिन पाणबुड्या या दीर्घकाळ पाण्यात राहू शकतात.

> भारतीय नौदलाने यापूर्वी जर्मन पाणबुडीच्या ‘एआयपी’ तंत्रज्ञानाच्या चाचण्या जर्मनीतील किव्ह येथे घेतल्या होत्या. यासाठी जर्मनी व स्पेनचे भारताला सहकार्य मिळाले. स्पेनच्या नवांतिया व भारताच्या एल ॲॅण्ड टी कंपनीच्या भागीदारीने सहा एआयपी तंत्रज्ञानाने सुसज्ज पाणबुड्या बनवल्या जाणार आहेत. हे काम जर्मन शीपबिल्डिंग कंपनी ‘थायसेक्रुप मरीन सिस्टीम’च्या मदतीने केले जाईल.

logo
marathi.freepressjournal.in