जसप्रीत बनली झैनब! पाकिस्तानी तरुणाशी लग्नासाठी स्वीकारला इस्लाम धर्म

जसप्रीत कौर ही आता पाकिस्तानात नाव बदलून आणि इस्लाम धर्म स्वीकारून झैनब बनली आहे. सध्या या लग्नाची पाकिस्तानमध्ये बरीच चर्चा आहे.
जसप्रीत बनली झैनब ; पाकिस्तानी तरुणाशी लग्नासाठी स्वीकारला इस्लाम धर्म
जसप्रीत बनली झैनब ; पाकिस्तानी तरुणाशी लग्नासाठी स्वीकारला इस्लाम धर्मX

जर्मनीतील भारतीय वंशाच्या एका शीख महिलेने पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील पुरुषाशी लग्न केल्याचे समोर आले आहे. जसप्रीत कौर ही आता पाकिस्तानात नाव बदलून आणि इस्लाम धर्म स्वीकारून झैनब बनली आहे. सध्या या लग्नाची पाकिस्तानमध्ये बरीच चर्चा आहे.

रिपोर्टनुसार, जसप्रीत मूळची भारतीय पंजाबमधील लुधियाना येथील आहे. जसप्रीत आणि अर्सलान अली यांची पहिली भेट परदेशात झाली होती. यानंतर अर्सलानने जसप्रीतला पाकिस्तानात येण्याचे आमंत्रण दिले आणि त्यांनी लग्न केले. पाकिस्तानात १६ जानेवारी रोजी जसप्रीत आणि अर्सलान यांची भेट झाली. पाकिस्तानने जसप्रीतला धार्मिक भेटीसाठी व्हिसा जारी केला असून हा सिंगल एंट्री व्हिसा १५ एप्रिलपर्यंत वैध आहे. जसप्रीतकडे म्युनिकमधून (जर्मनी) जारी केलेला भारतीय पासपोर्ट आहे.

'जामिया हनफिया सियालकोट'ने जारी केलेल्या प्रमाणपत्राद्वारे जसप्रीत कौरच्या धर्मांतराची पुष्टी झाली आहे. जामिया हनाफिया, सियालकोट येथे झैनबचा विवाह अली अर्सलान याच्याशी झाला. जामिया हनाफियाच्या प्रशासकांनी सांगितले की कौर त्यांच्या संस्थेत इस्लामचा स्वीकार करणाऱ्या दोन हजाराहून अधिक गैर-मुस्लिमांपैकी एक आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी अंजू नावाची भारतीय महिला एका मुस्लिम पुरुषाशी लग्न करण्यासाठी पाकिस्तानात गेली होती. त्याआधी सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला एका हिंदू पुरुषासोबत लग्नासाठी भारतात आली. या दोघींची लव्हस्टोरी बरीच चर्चेत होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in