कन्फर्म तिकीट पण प्लॅन बदलला? टेन्शन नको! आता ‘डेट चेंज’ची मोफत सोय; रेल्वेचा नवा नियम

रेल्वेच्या कन्फर्म तिकिटाची प्रवासाची तारीख बदलण्याची मोफत सोय आता रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही कॅन्सलेशन फी किंवा अतिरिक्त चार्ज भरावा लागणार नाही.
कन्फर्म तिकीट पण प्लॅन बदलला? टेन्शन नको!  आता ‘डेट चेंज’ची मोफत सोय; रेल्वेचा नवा नियम
कन्फर्म तिकीट पण प्लॅन बदलला? टेन्शन नको! आता ‘डेट चेंज’ची मोफत सोय; रेल्वेचा नवा नियम संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : रेल्वेच्या कन्फर्म तिकिटाची प्रवासाची तारीख बदलण्याची मोफत सोय लवकरच रेल्वे उपलब्ध करून देणार आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतीही कॅन्सलेशन फी किंवा अतिरिक्त चार्ज देखील भरावा लागणार नाही. नवीन प्रस्तावानुसार, प्रवाशांना त्यांच्या कन्फर्म तिकिटांची प्रवास तारीख ऑनलाइन बदलण्याची परवानगी असेल.

तारीख बदलता येणार, पण कन्फर्म तिकिटाची हमी नाही

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, जानेवारी २०२६ पासून प्रवासी कन्फर्म तिकिटाची तारीख बदलू शकतील. तथापि, या प्रक्रियेत तारीख बदलल्यास कन्फर्म तिकिटाची हमी नसेल. सीट उपलब्धतेवर ती आधारित असेल, असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

जर तुमच्याकडे २० नोव्हेंबरला ठाणे ते मडगावला जाणारे कन्फर्म तिकिट असेल आणि काही कारणास्तव तुमचा प्लॅन बदलून ५ दिवस पुढे ढकलला, तर २५ नोव्हेंबरसाठी तुम्हाला नवीन तिकिट घेण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या २० नोव्हेंबरच्या कन्फर्म रेल तिकिटाची प्रवास तारीख ऑनलाइन बदलू शकता आणि त्याच तिकिटाने २५ नोव्हेंबरला मडगावचा प्रवास करू शकता. विशेष म्हणजे या प्रक्रियेसाठी तुमचे पैसे कापले जाणार नाहीत.

नव्या नियमामुळे रेल्वे प्रवाशांना खरोखर दिलासा मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in