आता ८ तास आधी तिकीट रद्द केले तरच मिळणार परतावा; रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या नियमांत बदल

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी रेल्वे क्षेत्रात मोठ्या सुधारणांची घोषणा केली असून, तिकीट रद्द करण्याच्या नियमात कडक बदल करण्यात आले आहेत. आता गाडी सुटण्यापूर्वी किमान ८ तास आधी तिकीट रद्द केले तरच प्रवाशांना परतावा मिळणार आहे. सध्या हा नियम ४ तासांचा होता. हे नवीन नियम १ एप्रिल २०२६ ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान लागू होणार आहेत.
आता ८ तास आधी तिकीट रद्द केले तरच मिळणार परतावा; रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या नियमांत बदल
आता ८ तास आधी तिकीट रद्द केले तरच मिळणार परतावा; रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या नियमांत बदल
Published on

नवी दिल्ली : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी रेल्वे क्षेत्रात मोठ्या सुधारणांची घोषणा केली असून, तिकीट रद्द करण्याच्या नियमात कडक बदल करण्यात आले आहेत. आता गाडी सुटण्यापूर्वी किमान ८ तास आधी तिकीट रद्द केले तरच प्रवाशांना परतावा मिळणार आहे. सध्या हा नियम ४ तासांचा होता. हे नवीन नियम १ एप्रिल २०२६ ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान लागू होणार आहेत. वैष्णव यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन नवीन नियमांबाबत माहिती दिली. भारतीय रेल्वेने तिकीट रद्द करण्याचे नियम अधिक कडक केले आहेत. आता जर एखाद्या प्रवाशाने ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधीपर्यंत तिकीट रद्द केले, तरच त्याला परतावा मिळणार आहे. पूर्वी ही वेळ ४ तास होती, जी आता वाढवून ८ तास करण्यात आली आहे. तथापि, २४ ते ८ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास अजूनही ५०% रक्कमच परत मिळेल.

याव्यतिरिक्त, आता प्रवासी ट्रेन सुटण्याच्या ३० मिनिटे आधीपर्यंत आपले बोर्डिंग स्टेशन (जिथून ट्रेन पकडायची आहे ते स्थानक) बदलणे शक्य होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, एजंट आणि दलालांकडून होणारी तिकिटांची साठेबाजी रोखण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. नवीन नियम १ ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यात लागू होतील.

तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी निर्णय

रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, दलालांच्या कार्यपद्धतीचा विचार करून हा बदल करण्यात आला आहे. दलाल अनेकदा अतिरिक्त तिकिटे बुक करायचे आणि ग्राहक न मिळाल्यास ट्रेन सुटण्यापूर्वी अगदी काही वेळ आधी तिकीट रद्द करून परतावा मिळवायचे. रिफंडचे नियम कडक केल्यामुळे दलालांकडून तिकिटांची होणारी 'कॉर्नरिंग' (तिकीट दाबून ठेवणे) कमी होईल आणि सामान्य प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल.

चार्ट तयार झाल्यावर स्टेशन येणार बदलता

रेल्वे मंत्रालयाने बोर्डिंग स्टेशन बदलण्याची कालमर्यादा वाढवली आहे. आता प्रवासी ट्रेनच्या नियोजित वेळेच्या ३० मिनिटे आधीपर्यंत आपले बोर्डिंग पॉईंट बदलू शकतील. आतापर्यंत ही सुविधा केवळ चार्ट तयार होण्यापूर्वीच मिळत होती. ज्या मोठ्या शहरांमध्ये एकापेक्षा जास्त रेल्वे स्थानके आहेत, तिथे हा नियम प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. प्रवासी आपल्या सोयीनुसार जवळच्या कोणत्याही स्थानकावरून ट्रेन पकडू शकतील. प्रवासी IRCTC ची वेबसाइट, ॲप किंवा रेल्वे काउंटरच्या माध्यमातून बोर्डिंग स्टेशन बदलू शकतात. मात्र, एकदा बोर्डिंग पॉईंट बदलल्यानंतर तुम्हाला जुन्या स्थानकावरून ट्रेन पकडता येणार नाही.

ट्रेन ३ तासांपेक्षा जास्त उशिरा असल्यास पूर्ण परतावा

रेल्वेने स्पष्ट केले आहे की, काही विशेष परिस्थितीत रिफंडचे जुने नियम कायम राहतील. तसेच जर ट्रेन पूर्णपणे रद्द झाली किंवा आपल्या नियोजित वेळेपेक्षा ३ तासांपेक्षा जास्त उशिरा असेल, तर प्रवासी ‘टीडीआर’ फाइल करून पूर्ण परतावा मिळवू शकतात. याशिवाय, चार्ट तयार झाल्यानंतरही तिकीट पूर्णपणे वेटिंगमध्ये राहिले, तर ते ऑटोमॅटिक रद्द होईल आणि पूर्ण पैसे परत मिळतील.

मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले की, एजंटांकडून होणारा काळाबाजार आणि शेवटच्या क्षणी होणारी तिकीटांची अफरातफर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिलासादायक निर्णय

कॅन्सलेशनचे नियम कडक केले असले तरी, प्रवाशांच्या सुविधेसाठी काही महत्त्वाचे बदलही करण्यात आले आहेत:

*बोर्डिंग पॉईंटमध्ये बदल : आता प्रवासी गाडी सुटण्याच्या ३० मिनिटे आधीपर्यंत आपले बोर्डिंग स्टेशन (जिथून गाडी पकडणार आहात ते ठिकाण) डिजिटल पद्धतीने बदलू शकतील. पूर्वी हा बदल फक्त चार्ट तयार होण्यापूर्वीच शक्य होता.

*प्रवास श्रेणी सुधारणा : ज्या प्रवाशांकडे रेल्वे काउंटरचे तिकीट आहे, ते आता गाडी सुटण्याच्या ३० मिनिटे आधीपर्यंत आपली क्लास (उदा. स्लीपर ते एसी) बदलू शकतील. मात्र, ही सुविधा ऑनलाइन तिकीट धारकांसाठी उपलब्ध नाही.

*दलालांवर वचक : तत्काळ बुकिंगमध्ये आधार आधारित ओटीपी आणि अँटी-बॉट सॉफ्टवेअरचा वापर सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे ३ कोटी संशयास्पद युझर आयडी बंद करण्यात आले आहेत.

इतर महत्त्वाच्या घोषणा

रेल्वेने मीठ आणि ऑटोमोबाईल वाहतुकीसाठी विशेष कंटेनर आणि वॅगन्स सुरू करण्याची घोषणा केली आहे. मिठाच्या वाहतुकीसाठी गंज न लागणारे खास कंटेनर वापरले जातील, ज्यामुळे हाताळणी अधिक कार्यक्षम होईल.

logo
marathi.freepressjournal.in