हेरगिरी करणाऱ्या भारतीय जवानाला १० वर्षांची शिक्षा

पाकिस्तानी दूतावासातील कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती दिल्याचा आरोप सिद्ध झाला
हेरगिरी करणाऱ्या भारतीय जवानाला १० वर्षांची शिक्षा
Published on

नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या भारतीय जवानावर कोर्टमार्शल करण्यात आले आहे. त्याला १० वर्षे १० महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर पाकिस्तानी दूतावासातील कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती दिल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. हा जवान भारतीय लष्कराच्या उत्तर सीमेवर चालणाऱ्या लष्कराच्या हालचालींची माहिती पाकला देत होता. एका महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली या जवानाला कोर्टमार्शल केले. या जवानाने पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयात काम करणाऱ्या आबीद हुसैन ऊर्फ नाईक आबिद यांना गुप्त कागदपत्रे दिली. हा सैनिक जिथे तैनात होता, त्याची माहिती पाकला दिली. तसेच सर्व जवानांची ड्युट्यांची यादीही पाकला दिली. कोविड लॉकडाऊनच्या काळात लष्कराच्या वाहनांची माहिती हुसैनला दिली.

logo
marathi.freepressjournal.in