भारतीय शेअर बाजारात दोलायमान स्थितीनंतर घसरण

३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ३५.७८ अंक किंवा ०.०६ टक्का घसरुन ५८,८१७.२९वर बंद झाला.
भारतीय शेअर बाजारात दोलायमान स्थितीनंतर घसरण

भारतीय शेअर बाजारात बुधवारी दोलायमान स्थितीनंतर घसरण झाली. नफावसुलीमुळे माहिती तंत्रज्ञान आणि बांधकाम कंपन्यांच्या समभागांची विक्री झाली तर धातू, तेल आणि वायू कंपन्यांच्या समभागात वाढ झाली. सेन्सेक्स, निफ्टीत किरकोळ घसरण झाली.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ३५.७८ अंक किंवा ०.०६ टक्का घसरुन ५८,८१७.२९वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ९.६५ अंकांनी घसरण होऊन १७,५३४.७५ वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत बजाज फायनान्सचा समभाग सर्वाधिक २.६६ टक्के घसरण झाली. त्यानंतर एनटीपीसी, एचसीएल टेक, विप्रो, एशियन पेंटस‌्, अल्ट्रा सिमेंट आणि एसबीआय यांच्या समभागात घट झाली. तर दुसरीकडे टाटा स्टील, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एल ॲण्ड टी आणि इंडस‌्इंड बँक यांच्या समभागात वाढ झाली.

आशियाई बाजारात शांघाय, टोकियो आणि सेऊलमध्ये घट झाली. तर युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत वाढ झाली. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.०५ टक्के घसरुन प्रति बॅरलचा भाव ९५.३० अमेरिकन डॉलर्स झाला. विदेशी गुंतवणूक संस्थांनी सोमवारी १४४९.७० कोटींच्या समभागांची खरेदी केली. चलन बाजारात बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया १५ पैशांनी मजबूत होऊन ७९.४८ झाला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in