भारतीय विद्यार्थी कॅनडापासून दूर ;तणावामुळे पर्यायांचा शोध सुरू

कॅनडातील विद्यापीठांत यापूर्वी प्रवेश मिळालेले अनेक विद्यार्थीही आता तेथे जाण्यास तयार नाहीत
भारतीय विद्यार्थी कॅनडापासून दूर ;तणावामुळे पर्यायांचा शोध सुरू

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडात निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम शिक्षण क्षेत्रावरही पडला आहे. कॅनडात द्वेषभावनेपोटी हल्ले होण्याची भीती वाटत असल्याने भारतीय विद्यार्थी कॅनडापासून दूर जात आहेत. आता त्यांनी कॅनडाऐवजी अन्य देशांतील शिक्षण संस्थांचा पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.

दरवर्षी भारतातून कॅनडा, अमेरिका, युरोपीय देश, ऑस्ट्रेलिया आदी ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी जात असतात. या देशांनाही भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणशुल्काच्या माध्यमातून बरीच कमाई होत असते. पण आता कॅनडा-भारतातील राजनैतिक तणावाचा त्यावर परिणाम झालेला दिसतो. अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी यंदा कॅनडात जाण्यात अस्थिरता आणि भीती वाटत असल्याने अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया असे पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. कॅनडातील विद्यापीठांत यापूर्वी प्रवेश मिळालेले अनेक विद्यार्थीही आता तेथे जाण्यास तयार नाहीत. ते प्रवेश रद्द करून अन्यत्र जाण्याची तयारी करत आहेत. इतकेच नव्हे, तर लग्नसमारंभ आणि व्यापारी परिषदांनिमित्त कॅनडाला जाणारे प्रवासीही आता त्यांचे नियोजित दौरे रद्द करताना दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in