भारतीय पडले यूपीआयच्या प्रेमात; ५० टक्क्याने व्यवहार वाढले

पूर्वी पैसे पाठवण्यासाठी मनीऑर्डर वापरली जायची. त्यासाठी ५ ते ६ दिवस लागत होते.
भारतीय पडले यूपीआयच्या प्रेमात; ५० टक्क्याने व्यवहार वाढले

नवी दिल्ली : पूर्वी पैसे पाठवण्यासाठी मनीऑर्डर वापरली जायची. त्यासाठी ५ ते ६ दिवस लागत होते. त्यानंतर एनईएफटी, आरटीजीएसने बँकिंग क्षेत्राला वेग दिला. त्यातून तासाभरात पैसे मिळू लागले. आता यूपीआयच्या काळात समोरच्या व्यक्तीला तात्काळ पैसे मिळत आहेत. भारतीय यूपीआय व्यवहारांच्या प्रेमात पडले आहेत. एप्रिल २०२३ व एप्रिल २०२४ मध्ये भारतीयांच्या यूपीआय व्यवहारात तब्बल ५० टक्के वाढ झाली आहे. एप्रिल २०२४ मध्ये १३३० कोटी रुपयांचे यूपीआय व्यवहार झाले. यातून १९.६४ लाख कोटी रुपयांचे हस्तांतरण झाले. तर एप्रिल २०२३ मध्ये ८८६ कोटी यूपीआय व्यवहार झाले होते. या व्यवहारातून १४.१६ लाख कोटींचे व्यवहार झाले.

मार्च २०२३ मध्ये यूपीआय व्यवहारांचा विक्रम झालेला आहे. मार्च २०२३ मध्ये एका महिन्यात १३४४ कोटी व्यवहार झाले. त्यातून १९.७८ लाख कोटींचे व्यवहार झाले. तर एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या वर्षभरात १३०६८ कोटी यूपीआय व्यवहार झाले. त्यातून लोकांनी १९९.९५ लाख कोटींचे व्यवहार झाले. २०२२-२३ पेक्षा हे प्रमाण ४३.६८ टक्के अधिक आहे. २०१६ मध्ये यूपीआय सेवा भारतात लागू करण्यात आली. एनपीसीआयने ही सेवा बनवली आहे. यापूर्वी डिजिटल वॅालेट वापरावे लागत होते. त्यासाठी केवायसी करावी लागत होती.

यूपीआय कसे काम करते?

यूपीआय सेवेसाठी तुम्हाला एक आभासी पेमेंट ॲॅड्रेस तयार करावा लागतो. त्यानंतर तो बँक खात्याला जोडावा लागतो. त्यानंतर तुम्हाला बँक खाते, बँकेचे नाव, आयएफएससी कोड लक्षात ठेवण्याची गरज लागत नाही. पैसे देणारा आपल्या मोबाईल क्रमांकावरून पेमेंटची रिक्वेट देतो.

परदेशातही सुरू

यंदाच्या फेब्रुवारीत फ्रान्स, श्रीलंका, मॉरिशसमध्ये यूपीआय सुरू झाले. पॅरिसच्या आयफेल टॉवरवर यूपीआय पहिल्यांदा भारतीय दूतावासाच्या मदतीने सुरू केले. श्रीलंका व मॉरिशसला जाणारे भारतीय नागरिक तेथे त्याचा वापर करू शकतात. रशिया, सिंगापूर येथेही ही सेवा सुरू केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in