'ते' विमान अखेर मुंबईत दाखल; 25 प्रवासी फ्रान्समध्येच थांबले, 276 परतले

या विमानातील 25 प्रवाशांनी फ्रांसमध्ये आश्रय मिळण्यासाठी अर्ज करण्याची इच्छा व्यक्त केली होती असून ते सध्या फ्रान्समध्येच आहेत.
'ते' विमान अखेर मुंबईत दाखल; 25 प्रवासी फ्रान्समध्येच थांबले, 276 परतले

खऱ्या आयुष्यातल्या 'डंकी' प्रसंगासारखे भासणारे, मानवी तस्करीच्या संशयावरुन गेल्या चार दिवसांपासून फ्रान्समध्ये अडकून पडलेले 303 प्रवासी असेलेले विमान अखेर मंगळवारी (26 डिसेंबर) पहाटे मुंबईत परतले. या विमानात 276 हून अधिक प्रवासी होते. यापैकी बहुतांश प्रवासी हे भारतीय आहेत. फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये हे विमान थांबले होते. रविवारी तेथील अधिकाऱ्यांनी या विमानाला पुन्हा उड्डाण करण्याची परवानगी दिली होती. मात्र, यापैकी काहींनी फान्समध्ये आश्रयासाठी अर्ज करण्याची इच्छा व्यक्ती केली. यामुळे फ्रान्समधील वॅट्री विमानतळावरुन पहाटे अडीच वाजता या विमानाने उड्डाण घेतले. मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास हे एअरबस विमान मुंबई विमातळावर पोहचले.

फ्रान्स प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुलांसह सुमारे 25 प्रवाशांनी फ्रान्समध्ये आश्रय मिळण्यासाठी अर्ज करण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण त्यांच्या आश्रयअर्जावर अद्याप निर्णय न झाल्याने ते लोक सध्या फ्रान्समध्येच आहेत. तर, इतर दोघांना पकडून न्यायाधिशांसमोर हजर करण्यात आल्यानंतर त्यांना सहाय्यक साक्षीदार म्हणून ठेवत त्यांना सोडण्यात आले.

काय आहे प्रकरण?

रुमानियाच्या लिजिंड एअरलाइन्सचे एअरबस ए-३४० प्रकारचे विमान गेल्या आठवड्यात ३०३ प्रवाशांना घेऊन संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) दुबईहून मध्य अमेरिकेतील निकाराग्वा या देशात निघाले होते. वाटेत गुरुवारी हे विमान फ्रान्समधील पॅरिसपासून १५० किमी अंतरावरील वॅट्री नावाच्या विमानतळावर उतरले. तेथे फ्रान्सच्या पोलिसांना या विमानातील प्रवाशांबद्दल संशय आला. या प्रवाशांत बहुसंख्य भारतीय आहेत आणि त्यातही हिंदी आणि तमिळ भाषिकांचा जास्त भरणा आहे. हे प्रवासी निगाराग्वातून पुढे अवैधपणे अमेरिकेत किंवा कॅनडात घुसण्याचा प्रयत्न करणार असल्याची शंका फ्रान्सच्या पोलिसांना आली. त्यामुळे त्यांना तीन दिवस फ्रान्समध्ये थांबवण्यात आले आणि स्थानिक पोलीस आणि न्यायालयाकडून त्यांची चौकशी करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in