भारनियमनाच्या त्रासापासून यंदा सुटका?, केंद्र शासनाने व्यक्त केला विश्वास

भारनियमनाच्या समस्येला यंदा तोंड द्यावे लागणार नाही, असा विश्वास केंद्र शासनाने व्यक्त केला आहे.
भारनियमनाच्या त्रासापासून यंदा सुटका?, केंद्र शासनाने व्यक्त केला विश्वास

नवी दिल्ली : कोळसा मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२३ ते २५ डिसेंबर २०२३ या आर्थिक वर्षात देशाचे कोळसा उत्पादन ६६४.३७ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ५९१.६४ दशलक्ष टन इतके उत्पादन झाले होते. या तुलनेत यावर्षीची वाढ ही १२.२९ टक्के इतकी लक्षणीय आहे. यामुळे देशात यावेळी औष्णिक वीज प्रकल्पांना कोळसा कमी पडणार नाही. परिणामी भारनियमनाच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही, असा विश्वास केंद्र शासनाने व्यक्त केला आहे.

कोळसा निर्यातीत एप्रिल २०२३ ते २५ डिसेंबर २०२३ या कालावधीत आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एकत्रित कामगिरी ६९२.८४ मेट्रिक टन इतकी होती. मागील वर्षाच्या याच कालावधीतील ६२२.४० मेट्रिक टनाच्या तुलनेत ती ११.३२ टक्के इतकी वाढ झाली आहे. ही वाढ ऊर्जा क्षेत्राच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण आहे. याव्यतिरिक्त, एप्रिल २०२३ ते २५ डिसेंबर २०२३ या कालावधीत ऊर्जा क्षेत्राला एकूण कोळसा निर्यातीत ८.३९ टक्के इतकी लक्षणीय वाढ झाली आहे. निर्यात ५७७.११ मेट्रिक टनावर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ती याच कालावधीतील ५३२.४३ मेट्रिक टन इतकी होती.

खाणी, औष्णिक ऊर्जा प्रकल्प, पारगमन इत्यादींसह कोळसा साठ्याची स्थिती ९१.०५ मेट्रिक टन होती. गेल्या वर्षीच्या म्हणजे या कालावधीत ती ७९.९० मेट्रिक टन इतकी होती. त्यातही २१.५७ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त कोल इंडियामधील पिटहेड कोळसा साठा ५३ टक्क्यांनी वाढला आहे. देशातील वाढत्या ऊर्जा मागणीची पूर्तता करण्यासाठी, पुरेसा कोळसा पुरवठा करण्याचे कोळसा मंत्रालयाने ठरवले आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना कार्यक्षम कोळसा पुरवठ्यामुळे विविध ठिकाणी कोळशाचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे यावेळी भारनियमनाची समस्या उद्भवणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in