देशातील पहिल्या ३-डी प्रिंटेड पोस्ट ऑफिसचे बंगळुरुत उद्घाटन

एक हजार चौरस फूट क्षेत्रात अत्यंत कमी वेळात आणि टिकाऊ बांधकाम करण्यात आले आहे.
देशातील पहिल्या ३-डी प्रिंटेड पोस्ट ऑफिसचे बंगळुरुत उद्घाटन

बंगळुरू : देसातील पहिल्या ३-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारे बांधल्या गेलेल्या पोस्ट कार्यालयाचे शुक्रवारी बंगळुरू येते उद्घाटन झाले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.

थ्री-डी किंवा त्रिमित प्रिंटिंग या नवीन तंत्रज्ञानाचा वेगाने विकास आणि प्रसार होत आहे. त्यामध्ये इच्छित वस्तूची निर्मिती करण्यासाठी त्याचे संगणकावर तयार केलेले डिझाइन ३-डी प्रिंटरला पुरवले जाते. प्रिंटरला ती वस्तू ज्या पदार्थापासून तयार करायची असेल त्याचा पुरवठा करण्यात येतो. नंतर डिझाइनबरहुकूम त्या-त्या पदार्थांचे एकमेकांवर थर देत ती संपूर्ण वस्तू तयार केली जाते. या पोस्ट ऑफिसचे डिझाइन तयार करण्यास आयआयटी-मद्रासने मदत केली होती आणि त्याची प्रत्यक्ष बांधणी लार्सन अँड टुब्रो कंपनीने केली आहे. एक हजार चौरस फूट क्षेत्रात अत्यंत कमी वेळात आणि टिकाऊ बांधकाम करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in