देशाचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे लग्नबंधनात ; वयाच्या ६८व्या वर्षी केलं तिसरं लग्न

हरीश साळवे हे केंद्र सरकारच्या नव्याने स्थापन झालेल्या 'वन नेशन-वन इलेक्शन' समितीचे सदस्य देखील आहेत
देशाचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे लग्नबंधनात ; वयाच्या ६८व्या वर्षी केलं तिसरं लग्न

देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी तिसरे लग्न केलं आहे. हरीश साळवे हे केंद्र सरकारच्या नव्याने स्थापन झालेल्या 'वन नेशन-वन इलेक्शन' समितीचे सदस्य देखील आहेत. साळवे यांची देशातील सर्वात जास्त महागडे वकील अशी त्याची ओळख आहे. हरीश साळवे यांनी नुकतेच ट्रिना यांच्यासोबत मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली. याआधी, मीनाक्षी (पहिली पत्नी) होती. साळवे आणि मीनाक्षी यांचा ३८ वर्षांच्या लग्नानंतर जून २०२० मध्ये त्याचा घटस्फोट झाला. साळवे यांना साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत.

हरीश साळवे यांच्या लग्नाला नीता अंबानी, ललित मोदी यांच्यासह अनेक जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित लावली होती. सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे ६८ वर्षीय वकील साळवे यांनी कुलभूषण जाधव यांच्यासह अनेक हाय-प्रोफाइल केसेस हाताळल्या आहेत. कुलभूषण जाधव यांच्या केससाठी त्यांची खूप प्रशंसा झाली होती.

इतकेच नाही तर, हरीश साळवे यांनी २००२ च्या हिट-अँड-रन प्रकरणात सलमान खानची केस देखील लढली होती. सलमानला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. यानंतर १० डिसेंबर २०१५ रोजी, सलमानला २००२ च्या हिट-अँड-रन आणि ड्रंक-अँड-ड्राइव्ह प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात आले होते. हरीश साळवे यांनी नोव्हेंबर १९९९ ते नोव्हेंबर २००२ पर्यंत भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून काम केलं तसेच साळवे यांनी वेल्स आणि इंग्लंडच्या न्यायालयांमध्ये राणीचे वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती .

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in