भारताच्या इंधन विक्रीत जूनमध्ये झाली वाढ

उद्योग - व्यवसायातील वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर इंधन विक्रीत वाढ झल्याचे उद्योगातील प्राथमिक आकडेवारीवरुन दिसते.
भारताच्या इंधन विक्रीत जूनमध्ये झाली वाढ

भारताच्या पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत जूनमध्ये वाढ झाली आहे. खरीप हंगामाची सुरुवात, उन्हाळी सुट्ट्यांची अखेर आणि उद्योग - व्यवसायातील वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर इंधन विक्रीत वाढ झल्याचे उद्योगातील प्राथमिक आकडेवारीवरुन दिसते.

देशात सर्वाधिक वापर होत असलेल्या डिझेलच्या विक्रीत जूनमध्ये ३५.२ टक्के वार्षिक आधारावर वाढ होत ७.३८ दशलक्ष टनची विक्री झाली. जून २०१९ मधील विक्रीच्या तुलनेत यंदा विक्री १०.५ टक्के तर जून २०२० च्या तुलनेत ३३.३ टक्के वाढ झाली आहे. तर यंदा मे मधील ६.७ दशलक्ष टनची विक्रीच्या तुलनेत ती ११.५ टक्के जास्त आहे. डिझेलच्या मागणीतील वाढ ही प्रथम एप्रिलमध्ये कोरोनापूर्व पातळीवर पोहचली. कृषी आणि वाहतूक क्षेत्रात वापर जासत झाला होता.

पेट्रोलची विक्री सरकारी मालकीच्या इंधन रिटेलर्सचा बाजारातील हिस्सा अंदाजे ९० टक्के असून जूनमध्ये तो २.८ दशलक्ष टन झाला. मागील वर्षी जूनच्या तुलनेत त्यात २९ टक्के वाढ झाली, जेंव्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती.

जून २०२०च्या मागणीच्या तुलनेत हा वापर ३६.७ टक्के जास्त आणि जून २०१९च्या कोरोनापूर्व पातळीच्या तुलनेत १६.५ टक्के जास्त असून त्यावेळी २.४ दशलक्ष टन विक्री झाली होती. मासिकवर आधारावर ही विक्री ३.१ टक्के वाढत गेली, अशी प्राथमिक आकडेवारी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार महिन्यानंतर दहा रुपयांची वाढ झाल्याने एप्रिलमध्ये इंधन वापरात घट झाली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in