चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.३ टक्के

कोरोना महामारीतून सावरल्यानंतर पुढील वर्षी मागणीत पुन्हा वाढ होऊन भारताच्या आर्थिक वृद्धी होण्यास मदत मिळेल.
चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.३ टक्के

एस अॅण्ड पी ग्लोबल रेटिंग्सने सोमवारी २०२२-२३या वर्षासाठी भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.३ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यासोबतच त्यांनी बाजारातील घसरण आणि महागाईबाबतही चिंता व्यक्त केली आहे. एस अॅण्ड पीच्या मते, २०२२च्या अखेरीपर्यंत महागाई दर आरबीआयच्या सहनशीलता बँडच्या ६ टक्क्यांच्या कमाल पातळीवर राहण्याची शक्यता आहे. आशिया खंडासाठीच्या आपल्या आर्थिक दृष्टीकोनमध्ये, एस अॅण्ड पीने म्हटले आहे की, कोरोना महामारीतून सावरल्यानंतर पुढील वर्षी मागणीत पुन्हा वाढ होऊन भारताच्या आर्थिक वृद्धी होण्यास मदत मिळेल.

एस अॅण्ड पी ग्लोबल रेटिंग्सने म्हटले आहे की आम्ही २०२२-२३या आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज ७.३ टक्के आणि पुढील आर्थिक वर्षासाठी ६.५ टक्के राहण्याचे भाकीत केले आहे. अर्थात त्यासाठी असलेल्या जोखमींवर हे अंदाज अवलंबून आहेत.

इतर अनेक संस्थांनी उच्च चलनवाढ आणि वाढत्या धोरणात्मक व्याजदरांमध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज कमी केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, फिच रेटिंगने चालू आर्थिक वर्षातील वाढीचा अंदाज आधीच्या ७.८ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आणला. इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चनेही भारताच्या जीडीपीचा अंदाज आधीच्या ७ टक्क्यांवरून ६.९ टक्क्यांवर कमी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in