भारताचा जीडीपी ६.५ टक्के राहणार; २०२४ बाबत संयुक्त राष्ट्राचा अहवाल

आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भारतातही उत्पादन प्रक्रिया सुरु केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारताचा जीडीपी ६.५ टक्के राहणार; २०२४ बाबत संयुक्त राष्ट्राचा अहवाल

संयुक्त राष्ट्रे : भारताचा जीडीपी वृद्धी दर २०२४ मध्ये ६.५ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी जारी केलेल्या ताज्या अहवालात व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भारतातही उत्पादन प्रक्रिया सुरु केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

२०२४-२५ या वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ६.५ टक्के राहील, असा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या ट्रे़ड अँड डेव्हलपमेंट अर्थातयूएनसीटीएसी शाखेने वर्तवला आहे. मंगळवारी या शाखेकडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेसंदर्भात विश्लेषण करताना त्यात भारतीय अर्थव्यवस्थेचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार २०२३ मध्ये भारताचा विकासदर ६.७ टक्के इतका होता. २०२४ मध्ये हा दर ६.५ टक्के इतका असेल. जगभरातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी भारतीय अर्थव्यवस्था एक असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

“२०२३मध्ये देशांतर्गत गुंतवणूक, सेवा क्षेत्रात आलेली तेजी आणि त्यासाठी स्थानिक पातळीवरच आलेली मोठ्या प्रमाणातील मागणी या गोष्टींमुळे आर्थिक विकासाचा दर ६.७ टक्क्यांवर राहिला”, असे या अहवालात नमूद केलं आहे. तसेच, अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात आपली उत्पादन यंत्रणा आणि पुरवठा व्यवस्था उभी केल्यामुळे त्याचाही देशाच्या आर्थिक विकासाला फायदा होत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

भारतातील गुंतवणूक सक्षम

गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्राकडून तयार करण्यात आलेला हा अहवाल जाहीर करण्यात आला. ‘२००४ फायनान्सिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट: फायनान्सिंग फॉर डेव्हलपमेंट अॅट ए क्रॉसरोड्स’ असं या अहवालाचं नाव असून त्यात दक्षिण आशियामध्ये, प्रामुख्याने भारतात गुंतवणूक सातत्याने उत्तम राहिली आहे, असं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in