भारताच्या पारुल चौधरीचा राष्ट्रीय विक्रम ; महिला 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये पटकावलं अकरावं स्थान

याचबरोबर पारुलने राष्ट्रीय विक्रम साधत पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्रता देखील मिळवली आहे.
भारताच्या पारुल चौधरीचा राष्ट्रीय विक्रम ; महिला 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये पटकावलं अकरावं स्थान
Published on

भारताच्या पारुल चौधरीने हंगेरी येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 11 वे स्थान मिळवलं आहे. त्यात तिने 9:15.31 च्या वेळेसह एक नवीन राष्ट्रीय विक्रम केला आहे. याचबरोबर पारुलने राष्ट्रीय विक्रम साधत पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्रता देखील मिळवली आहे.

स्टीपलचेसमध्ये, ब्रुनेईचा अॅथलीट विन्फ्रेड मुटाइल यावीने 8:54.29 च्या वेळेसह सुवर्णपदक जिंकलं. केनियाच्या बीट्रिस चेपकोचने हंगामातील सर्वोत्कृष्ट 8:58.98 सह रौप्य पदक जिंकलं आणि दुसऱ्या केनियाच्या फेथ चेरोटिचने 9:00.69 च्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कांस्यपदक मिळवलं आहे.

पारुल चौधरी 200 मीटर स्प्लिटमध्ये स्टीपलचेसमध्ये आघाडीवर होती पण तिने थोडी गती गमावली आणि 11 व्या स्थानावर राहिली. तसंच, 2900 मीटरच्या स्प्लिटपर्यंत, ऍथलीटने शेवटच्या 100 मीटर स्प्लिटमध्ये दोन स्थानांनी झेप घेत 13 व्या क्रमांकावर होता. यामुळे तिला 11 वे स्थान मिळवता आलं.

logo
marathi.freepressjournal.in