भारताच्या प्रवासी कारच्या निर्यातीत झाली २६ टक्के वाढ

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीशी तुलना करता ही वाढ खूप मोठी आहे
भारताच्या प्रवासी कारच्या निर्यातीत झाली २६ टक्के वाढ
Published on

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या प्रवासी कारच्या निर्यातीत २६ टक्के वाढ झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीशी तुलना करता ही वाढ खूप मोठी आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ॲटोमोबाई मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)ने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार प्रवासी वाहनांची निर्यात पहिल्या तिमाहीत १,६०,२६३ युनिटस‌् इतकी झाली आहे. तर २०२१-२२ मध्ये पहिल्या तिमाहीत हा आकडा १,२७,०८३ युनिटस‌् होता. वार्षिक आधारावर प्रवासी कार शिपमेंटमध्ये ८८ टक्के वाढ होऊन १,०४,४०० युनिटस‌् झाली तर बहुपयोगी वाहनांच्या निर्यातीत १८ टक्के वाढ होऊन ५५,५४७ युनिटस‌् झाली. व्हॅनच्या निर्यातीत घट होऊन ३१६ युनिटस‌् झाली.

ऑईल केकच्या निर्यातीत

जूनमध्ये दुप्पट वाढ

भारताच्या ऑईल केकच्या निर्यातीत जूनमध्ये दुप्पट वाढ होऊन जवळपास ४.३१,८४० टन झाली आहे. गेल्या वर्षी वरील महिन्यात ही निर्यात २,०३,८६८ टन इतकी झाली होती, अशी माहिती सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन (एसईए) ऑफ इंडिया यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in