नवी दिल्ली : फ्रान्सकडून विकत घेतलेल्या राफेल लढाऊ विमानांवर भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे बसवण्यासाठी भारताने दसाँ या फ्रेच कंपनीला विनंती केली आहे. राफेल विमानांवर स्वदेशी बनावटीची हवेतून हवेत मारा करणारी अस्त्र ही क्षेपणास्त्रे आणि स्मार्ट अँटि-एअरफील्ड वेपन (सॉ) ही शस्त्रे बसवली जाणार आहेत. त्याने राफेलची मारक क्षमता वाढणार आहे. ही शस्त्रे राफेलवर बसवण्यासाठी भारताने राफेलची निर्मिती करणाऱ्या दसाँ एव्हिएशन या कंपनीला विनंत केली आहे. भारतीय हवाई दलाने फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमाने विकत घेतली आहेत. त्याशिवाय भारतीय नौदलाच्या विमानवाहू नौकांवर तैनात करण्यासाठी राफेल मरीन प्रकारची २६ विमाने घेण्याचा प्रस्ताव आहे.