मनीष सिसोदिया यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्याचे संकेत

त्यांच्यावर देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्याची व लवकरच त्यांना अटक होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
मनीष सिसोदिया यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्याचे संकेत

सीबीआयने रविवारी दिल्लीचे उपमुख्यंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात लवकरच लुकआऊट नोटीस जारी करण्याचे संकेत दिले. तत्पूर्वी, सकाळी सिसोदियांसह अन्य १३ जणांविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता, तसेच त्यांच्यावर देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्याची व लवकरच त्यांना अटक होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

या वृत्तानंतर मनीष सिसोदिया यांनी एका ट्विटद्वारे स्थिती स्पष्ट केली. सिसोदिया म्हणाले, “तुमची संपूर्ण छापेमारी अपयशी ठरली. काहीच आढळले नाही. एका पैशाचीही हेराफेरी झाली नाही. आता तुम्ही सिसोदिया सापडत नसल्याची लुकआऊट नोटीस जारी केली. हे काय नाटक आहे मोदीजी? मी खुलेआम दिल्लीत फिरत आहे. सांगा कुठे यायचे आहे? मी तुम्हाला सापडत नाही काय?” दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले, “सर्वसामान्य व्यक्ती महागाईविरोधात व कोट्यवधी तरुण महागाईविरोधात संघर्ष करत आहेत. केंद्रानेही सर्वच राज्य सरकारच्या मदतीने बेरोजगारी व महागाईचा सामना केला पाहिजे. असे करण्यापेक्षा ते दररोज सकाळी सीबीआय व ईडीचा खेळ करत आहेत. अशाने देश पुढे कसा जाईल?” असा प्रश्न त्यांनी विचारला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in