'इंडिगो'चा प्रवास महागला; देशांतर्गत किमान ३७५, तर कमाल १३०० रुपयांची भाडेवाढ

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या 'इंडिगो'ने वाढत्या विमान इंधनाच्या किमतींमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या इंधन अधिभारात वाढ करण्याची घोषणा केली आहे. सुधारित दर आजपासून म्हणजेच ६ ऑक्टोबरपासून लागू झाले असून, या निर्णयामुळे विमान प्रवास अधिक महाग होणार आहे.
'इंडिगो'चा प्रवास महागला; देशांतर्गत किमान ३७५, तर कमाल १३०० रुपयांची भाडेवाढ
Published on: 

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या 'इंडिगो'ने वाढत्या विमान इंधनाच्या किमतींमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या इंधन अधिभारात वाढ करण्याची घोषणा केली आहे. सुधारित दर आजपासून म्हणजेच ६ ऑक्टोबरपासून लागू झाले असून, या निर्णयामुळे विमान प्रवास अधिक महाग होणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत मार्गावरील अंतरावरून इंधन अधिभारात १०० ते ३५० रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. मार्च महिन्यात सुरू करण्यात आलेल्या या अधिभारातील एप्रिलनंतरची ही दुसरी वाढ आहे. ५०० किमी पर्यंतचे अंतर: ३७५ रुपये, ५०१ ते १,००० किमी अंतर: ६०० रुपये, १,००१ ते १,५०० किमी अंतर: ९०० रुपये, १,५०१ ते २,००० किमी अंतर: १,१५० रुपये आणि २,००० किमी पेक्षा जास्त अंतर: १,३०० रुपये.

आंतरराष्ट्रीय दर

आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानांसाठीही हा अधिभार वाढवण्यात आला आहे: सार्क देश: १,००० ते ३,००० रुपये, आफ्रिका: ६,००० रुपये, युरोप सेवा: १०,००० रुपये, आग्नेय आशिया, जीसीसी आणि मध्य पूर्व, तसेच उत्तर आणि पूर्व आशिया: ५,५०० रुपये.

दरवाढीचे कारण

मध्यपूर्वेतील भू-राजकीय परिस्थितीमुळे मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, अलीकडच्या काही महिन्यांत विमान इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात इंधनाच्या किमतीत १४ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यामुळे, गेल्या दशकातील उच्चांकी पातळीवर एटीएफचा खर्च पोहोचला आहे. इंडिगोने निवेदनात म्हटले आहे की, विमानाच्या एकूण ऑपेरटिंग खर्चात इंधनाचा वाटा मोठा असतो. त्यामुळे वाढत्या खर्चाचा भार आणि नेटवर्कच्या अर्थकारणावर होणारा परिणाम पाहता, हा किरकोळ बदल करण्यात आला आहे. इंडिगो एअरलाइन्सची दररोज २,२०० हून अधिक उड्डाणे होतात. त्यामुळे या दरवाढीचा फटका लाखो प्रवाशांना बसणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in