औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा १८ महिन्यांचा नीचांक

निर्मिती क्षेत्र ऑगस्ट २०२२ मध्ये ०.७ टक्का (मागील वर्षी ११.१ टक्के) घसरले, तर वीज क्षेत्रात १.४ टक्के वाढ झाली
औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा १८ महिन्यांचा नीचांक

भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) ऑगस्टमध्ये घसरण होऊन उणे ०.८ टक्का झाला. गेल्या १८ महिन्यांचा हा नीचांक आहे. निर्मिती, खाण क्षेत्रातील घसरणीमुळे आयआयपी घसरल्याचे बुधवारी अधिकृत आकडेवारी जाहीर केल्याने दिसून आले. यापूर्वी फेब्रुवारी २०२१ मध्ये आयआयपी ३.२ टक्के होता, तर ऑगस्ट २०२१ मध्ये आयआयपी १३ टक्क्यांपर्यंत वाढला होता. यंदा जुलैमध्ये हा दर २.२ टक्के झाला होता.

निर्मिती क्षेत्र ऑगस्ट २०२२ मध्ये ०.७ टक्का (मागील वर्षी ११.१ टक्के) घसरले, तर वीज क्षेत्रात १.४ टक्के वाढ झाली. मागील वर्षी वरील महिन्यात ते १६ टक्के वधारले होते. खाण क्षेत्रात ऑगस्टमध्ये उणे ३.९ टक्के झाले असून, मागील वर्षी वरील महिन्यात ते २३.३ टक्के वाढले होते. यंदा एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत आयआयपी ७.७ टक्के वधारला असून, मागील वर्षी वरील कालावधीत हा दर २९ टक्के होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in