Interim Budget Special :  ‘लखपती दीदी’चा विस्तार

Interim Budget Special : ‘लखपती दीदी’चा विस्तार

बचत गटांशी संबंधित कोट्यवधी महिलांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. या बचत गटांशी संबंधित योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या बँक दीदी, अंगणवाडी दीदी इत्यादी महिलांचा समावेश

- प्रा. मुक्ता पुरंदरे

‘लखपती दीदी’ योजनेचा विस्तार करुन २०२५ पर्यंत तीन कोटी महिलांपर्यंत याचा लाभ पोहोचवायचे लक्ष्य अर्थसंकल्पामधून मांडण्यात आले. यामुळे बचत गटांशी संबंधित कोट्यवधी महिलांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. या बचत गटांशी संबंधित योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या बँक दीदी, अंगणवाडी दीदी इत्यादी महिलांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडताना मोदी सरकारने सुरू केलेल्या ‘लखपती दीदी’ या योजनेचा प्रामुख्याने उल्लेख केला. आतापर्यंत एक कोटी महिलांना या योजनेचा फायदा झाला असून २०२५ पर्यंत तीन कोटी महिलांपर्यंत याचा लाभ पोहोचवायचा आहे, असे त्यांनी जाहीर केले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. ‘लखपती दीदी योजना’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. १५ ऑगस्ट २०२३ रोजी लाल किल्ल्यावरून तिची घोषणा करण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे बचत गटांशी संबंधित कोट्यवधी महिलांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. या बचत गटांशी संबंधित योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या बँक दीदी, अंगणवाडी दीदी इत्यादी महिलांचा समावेश आहे. ही योजना त्यांच्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आहे. त्यामुळे त्यांना कौशल्य प्रशिक्षण घेऊन पैसे कमावता येतील आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. प्रशिक्षणाद्वारे व्यवसाय सुरू करण्याचे मार्ग शिकवले जातील. पंतप्रधानांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिलांना स्वावलंबी बनवायचे ध्येय सरकारतर्फे समोर ठेवण्यात आले आहे.

नव्या तरतुदींनुसार महिलांना आर्थिक साक्षरता कार्यशाळा, बचत प्रोत्साहन, मायक्रोक्रेडिट सुविधा, कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण, उद्योजकता समर्थन, विमा संरक्षण, डिजिटल आर्थिक समावेशन, सक्षमीकरण आणि आत्मविश्वास निर्माण करण्याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला संबंधित राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. महिलांना बचत गटांशी जोडले जाणे बंधनकारक आहे. त्यासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असणार आहे. या योजनेमुळे देशातील महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर होतील. योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार असून आर्थिक योजनांविषयी माहिती दिली जाणार आहे. महिलांना सक्षम करणे हा ‘लखपती दीदी’ योजनेमागील उद्देश आहे. या कार्यशाळांमध्ये अर्थसंकल्प, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक साधने समजून घेणे यासारख्या विषयांचा समावेश आहे.

लखपती दीदी योजनेंतर्गत महिलांना नियमित बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. लखपती दीदी योजनेंतर्गत महिलांना व्यवसाय, उद्योग, शिक्षण किंवा इतर गरजांसाठी छोटी कर्जे दिली जातात. या योजनेंतर्गत महिलांना डिजिटल बँकिंग सेवा, मोबाईल वॉलेट आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म कसे वापरायचे हे शिकण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. आर्थिक फायद्यांव्यतिरिक्त ही योजना विविध सक्षमीकरण कार्यक्रमांद्वारे महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यावर आणि आत्मसन्मान निर्माण करण्यावरदेखील लक्ष केंद्रित करते. या महिलांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर सकारात्मक परिणाम व्हावा, हा या योजनेमागील विचार आहे.

भारतातील फक्त एक टक्का स्त्रिया गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची चाचणी करतात. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये गंभीर आणि चौथा सर्वात सामान्य कर्करोग आहे. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने किमान ७० टक्के महिलांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी नियमित तपासणी करण्याची शिफारस केली आहे; परंतु देशातील केवळ एक टक्का महिला या महत्त्वपूर्ण तपासणीतून जात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in