महागाईने सर्वसामान्य हैराण ,कर्जाच्या दरात होणार वाढ?

महागाईने सर्वसामान्य हैराण ,कर्जाच्या दरात होणार वाढ?

कर्जावरील व्याजदरात ५.९ टक्क्यांपर्यंत वाढवू शकते, असा अंदाज फिच रेटिंगने मंगळवारी जाहीर केले

एकीकडे वाढत्या महागाईने सर्वसामान्य हैराण झाले असताना कर्जाच्या दरात वाढ होत असल्याने कर्जदारांचा हफ्ता वाढत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक डिसेंबर २०२२ पर्यंत रेपो रेट अर्थात कर्जावरील व्याजदरात ५.९ टक्क्यांपर्यंत वाढवू शकते, असा अंदाज फिच रेटिंगने मंगळवारी जाहीर केले.

ग्लोबल इकॉनॉमिक आऊटलुकच्या अपडेटमध्ये, फिचने म्हटले आहे की, भारताची अर्थव्यवस्था बिघडत चाललेले बाह्य वातावरण, वस्तूंच्या वाढत्या किमती आणि कडक जागतिक आर्थिक धोरणाचा सामना करत आहे. या सर्व बाबींमुळे आता अंदाज आहे की, आरबीआय डिसेंबर २०२२पर्यंत ५.९ टक्के आणि २०२३ आणि २०२४च्या अखेरीस ६.१५ टक्के (पूर्वीचा अंदाज ५ टक्के) राहील. विशेष म्हणजे, आरबीआयने नुकतेच रेपो दर ५० बेसिस पॉइंटने वाढवून रेपो रेट ४.९ टक्के केला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.९० टक्क्यानी वाढ केली असून, ३५ दिवसांत त्यात दोनदा वाढ केली आहे.

जूनमध्ये महागाई दर वाढीची शक्यता

पुढील काही महिन्यांत चलनवाढीचा दर उच्च पातळीवर राहण्याची अपेक्षा अर्थशास्त्रज्ञांना आहे कारण घटत्या आधारभूत परिणामामुळे त्यात सांख्यिकीय वाढ झाली आहे. सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती सुमारे १० डॉलर प्रति बॅरलने वाढल्या आहेत. तेल कंपन्यांनी ही वाढ देशांतर्गत किमतीशी जोडल्यास महागाई आणखी वाढेल. नायर म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ आणि रुपयाचे अवमूल्यन यांचा दुहेरी फटका जून२०२२च्या ग्राहक किंमत निर्देशांकावर अर्थात महागाई दर वाढेल

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in