महागाईमुळे त्रस्त असलेल्या जनतेला धक्का, स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत वाढ

१४.२ किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरसाठी आता ग्राहकांना ५० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत
महागाईमुळे त्रस्त असलेल्या जनतेला धक्का,  स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत वाढ

गेल्या काही महिन्यांपासून महागाईमुळे त्रस्त असलेल्या जनतेला बुधवारी आणखी एक धक्का बसला. गॅस वितरक कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत तब्बल ५० रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे १४.२ किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरसाठी आता ग्राहकांना ५० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. राजधानी दिल्लीत आता एका सिलिंडरसाठी १००३ रुपयांऐवजी १०५३ रुपये मोजावे लागणार आहेत. घरगुती सिलिंडरचे दर वाढल्याची व व्यावसायिक सिलिंडरचे दर घटण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या १ तारखेलाच कमर्शिअल सिलिंडरच्या किंमतीत तब्बल १९८ रुपयांची घट झाली होती. त्यानंतर बुधवारी (आज) पुन्हा या किंमतीत जवळपास ९ रुपयांची घट झाली आहे. दिल्लीत १९ किलोच्या एका व्यावसायिक सिलिंडरसाठी आता २०१२ रुपये मोजावे लागतील. यापूर्वी ही किंमत २०२२ रुपये होती. या नव्या किंमती ६ जुलैपासून लागू झाल्या आहेत. मार्च महिन्यापासून झालेली ही तिसरी दरवाढ आहे, तर वर्षभरातील चौथी वाढ आहे. यापूर्वी २२ मार्चला सिलिंडर ५० रुपयांनी महागला, त्यानंतर ७ मे रोजी पुन्हा ५० रुपयांनी महागला. पुन्हा १९ मे रोजी स्वयंपाकाचा सिलिंडर ३.५० रुपयांनी महागला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in