

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व खासदार पप्पू यादव यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यामुळे भाजपच्या खासदारांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती मुर्मू यांच्याबाबत सोनिया गांधी व पप्पू यादव यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. त्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे.
भाजपच्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, सोनिया गांधी-पप्पू यादव यांनी सर्वोच्च पदाची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींविरोधात अपमानास्पद व निंदनीय शब्दांचा वापर केला. त्यामुळे संसदीय विशेषाधिकार, नैतिकता, मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे.