मध्य प्रदेशातील संतापजनक घटना;गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार करून पेटविले

पीडिता जवळपास ८० टक्के भाजली असून, तिच्यावर ग्वाल्हेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मध्य प्रदेशातील संतापजनक घटना;गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार करून पेटविले

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशमधील मोरेना जिल्ह्यातील एका ३४ वर्षीय गर्भवती महिलेवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. पीडितेला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

पीडिता जवळपास ८० टक्के भाजली असून, तिच्यावर ग्वाल्हेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना अंबाह गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदकापुरा गावात घडली. तिच्यावर तीन पुरुषांनी अत्याचार केला, असे अंबाह पोलीस ठाण्याचे प्रमुख अलोक परिहार यांनी सांगितले. पीडिता एका महिलेसोबत गावात चर्चा करण्याच्या उद्देशाने गेली होती. सदर महिलेच्या पतीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप होता. दरम्यान, तिच्यावरच बलात्कार करण्यात आला. पीडिता ज्या महिलेच्या घरी गेली त्याच महिलेच्या पतीसह आणखी तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिच्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मध्य प्रदेश पोलिसांना या घटनेचा एक व्हिडीओ प्राप्त झाला आहे. पीडित महिलेने दंडाधिकाऱ्यांसमोर आपला जबाब नोंदवला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in