'आयएनएलडी’ नेत्याची गोळ्या घालून हत्या; खासगी रक्षकही जखमी; विरोधकांकडून जोरदार टीका

आपल्या सुरक्षेसाठी तीन खासगी रक्षक नियुक्त केले होते तेही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या घटनेवर विरोधकांनी जोरदार टीका केली
'आयएनएलडी’ नेत्याची गोळ्या घालून हत्या;  खासगी रक्षकही जखमी; विरोधकांकडून जोरदार टीका
Published on

चंदिगड : 'दी इंडियन नँशनल लोक दल'चे (आयएनएलडी) हरयाणा अध्यक्ष नफेसिंग राठी आणि एका कार्यकर्त्याची रविवारी अज्ञा हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. दिल्लीजवळच्या बहादूरगड येथून जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर गोळ्याचा वर्षाव केला. राठी यांनी आपल्या सुरक्षेसाठी तीन खासगी रक्षक नियुक्त केले होते तेही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या घटनेवर विरोधकांनी जोरदार टीका केली असून भाजपशासित राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली असल्याचे म्हटले आहे.

राठी हे बहादूरगढ येथील माजी आमदार आहेत, ते आपल्या गाडीतून जात असताना अन्य गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी झाज्जर जिल्ह्यात शहारात हल्ला केला. हल्लेखोरांनी राठी यांच्या गाडीवर गोळ्यांचा अक्षरश: वर्षाव केला.

logo
marathi.freepressjournal.in