आयएनएस विक्रांत २०२३ च्या अखेरपर्यंत युद्धसज्ज होणार

विमानवाहू युद्धनौका बनवण्यासाठी विकसित देशांच्या नियमांचेच पालन नौदलाकडून केले जात आहे
आयएनएस विक्रांत २०२३ च्या अखेरपर्यंत युद्धसज्ज होणार

देशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलात समाविष्ट झाली आहे. मात्र ही युद्धनौका २०२३ च्या अखेरपर्यंत युद्धसज्ज होऊ शकणार आहे. कारण या युद्धनौकेच्या आणखी काही चाचण्या होणे बाकी राहिल्या आहेत.

आयएनएस विक्रांतविषयी २५ ऑगस्ट रोजी नौदलाचे व्हाईस चीफ ऑफ स्टाफ व्हाईस अॅडमिरल एसएन घोरमडे म्हणाले की, नौदल विक्रांतवर मिग-२९ के लढाऊ विमानाच्या लँडींगची चाचणी यंदा नोव्हेंबरमध्ये सुरू करेल. या चाचण्या २०२३ च्या मध्यापर्यंत पूर्ण होतील. म्हणूनच ‘विक्रांत’ २०२३ च्या अखेरपर्यंतच पूर्णपणे युद्धसज्ज होऊ शकणार आहे.

अलिकडेच नौदलाने एका अधिकृत वक्तव्यात म्हटले होते की, विमानवाहू युद्धनौका बनवण्यासाठी विकसित देशांच्या नियमांचेच पालन नौदलाकडून केले जात आहे. २ सप्टेंबर रोजी विक्रांतच्या नौदलात अधिकृत समावेशानंतरच त्याच्या फिक्स्ड विंग एअरक्राफ्ट आणि त्याच्या एव्हिएशन फॅसिलिटी कॉम्प्लेक्स सुविधांची सुरूवात होईल. हे तेव्हाच सुरू केले जाईल, जेव्हा शिपची कमांड व कंट्रोलसह फ्लाईट सेफ्टीही त्यांच्या हातात असेल, असे नौदलाने म्हटले.

येणाऱ्या काही महिन्यांत आयएनएस विक्रांतची एव्हिएशन फॅसिलिटी कॉम्प्लेक्स म्हणजे एएफसी पूर्णपणे रशियन इंजिनिअर्स आणि टेक्निशिअन्सच्या मदतीने स्थापित केली जाईल. युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने रशियावर लावलेल्या प्रतिबंधांमुळे या इंजिनिअर्सना भारतात येण्यास उशीर होऊ शकतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in