अयोध्येतील दोन स्थानकांची रेल्वे बोर्ड अध्यक्षांकडून पाहणी 

अयोध्या रेल्वे स्थानकावर वाढलेली वर्दळ लक्षात घेता, शहराला भेट देणाऱ्या लोकांना अधिक सुविधा देण्यासाठी रेल्वे आपल्या स्थानकांचे नूतनीकरण करत आहे.
अयोध्येतील दोन स्थानकांची रेल्वे बोर्ड अध्यक्षांकडून पाहणी 
PM

अयोध्या : पुढील महिन्यात राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्येत येणाऱ्या भाविकांना कोणत्या कोणत्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत, त्याबद्दल विचारमंथन करण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा जया वर्मा सिन्हा यांनी बुधवारी अयोध्येतील दोन रेल्वे स्थानकांची पाहाणी केली.

यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत चर्चाही केली. यावेळी सिन्हा यांनी अयोध्या आणि रामघाट हॉल्ट रेल्वे स्थानकांची पाहणी केली आणि जवळपासच्या सर्व स्थानकांच्या स्थितीचा आढावा घेतला. अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर नवीन इमारतीचे बांधकाम ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे त्या म्हणाल्या. 

अयोध्या रेल्वे स्थानकावर वाढलेली वर्दळ लक्षात घेता, शहराला भेट देणाऱ्या लोकांना अधिक सुविधा देण्यासाठी रेल्वे आपल्या स्थानकांचे नूतनीकरण करत आहे. सिन्हा म्हणाल्या की, २२ जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्यानंतर मोठ्या संख्येने भाविक अयोध्येला जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या निमित्ताने विशेष गाड्या चालवण्याची सर्व तयारी रेल्वेने पूर्ण केली आहे, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी अयोध्या स्थानकावर रेल्वे आणि नागरी अधिकाऱ्यांसोबत भाविकांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधांबाबत विचारमंथन सत्र आयोजित केले होते, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

logo
marathi.freepressjournal.in