कोळसा घोटाळा प्रकरणी विजय दर्डांसह तिघांना अंतरिम जामीन मंजूर

या आरोपींना दिल्ली विशेष न्यायालयाने २६ जुलै रोजी दोषी ठरवून ४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती
कोळसा घोटाळा प्रकरणी विजय दर्डांसह तिघांना अंतरिम जामीन मंजूर
Published on

छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणाता चार वर्ष कैदेची शिक्षा झालेल्या माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि आणखी एका आरोपीला दिल्ली उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या आरोपींना दिल्ली विशेष न्यायालयाने २६ जुलै रोजी दोषी ठरवून ४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

१९९९ ते २००५ दरम्यान जेएलडी यवतमाळ यांना जे जुने ब्लॉक देण्यात आले होते. त्यांची माहिती लपवून यूपीए सरकारच्या काळात गैरमार्गाने कंत्राट मिळवल्याचा आरोप होता. यूपीए सरकारच्या काळात जे काही घोटाळे गाजले, त्यात कोसळा घोटाळ्याचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं.

दिल्ली विशेष न्यायालयाने २६जुलै रोजी राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांच्यासह मुलगा देवेंद्र दर्डा आणि जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लि. चे संचालक मनोजकुमार जयस्वाल यांना कोळसा घोटाळा प्रकरणी चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तसंच या प्रकरणात निवृत्त कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, दोन ज्येष्ठ अधिकारी के एस क्रोफा आणि के सी समरीया यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती.

logo
marathi.freepressjournal.in