नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाची सुरुवात ३१ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होणार आहे, तर १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या हंगामी अर्थसंकल्प सादर करतील, असे सूत्रांनी सांगितले. १७ व्या लोकसभेची मुदत १६ जूनला संपत आहे. तत्पूर्वी नवीन सरकार अस्तित्वात येणे गरजेचे आहे. २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका १० मार्च रोजी जाहीर झाल्या होत्या. ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान सात टप्प्यांत मतदान झाले होते.