अवयव प्रत्यारोपण करणारे रॅकेट उद्ध्वस्त

बांगलादेश आणि दिल्ली-एनसीआर क्षेत्रात चालविण्यात येणाऱ्या अवयव प्रत्यारोपण रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून याप्रकरणी दिल्लीस्थित डॉक्टरसह सहा जणांना अटक केली आहे, असे मंगळवारी पोलिसांनी सांगितले.
अवयव प्रत्यारोपण करणारे रॅकेट उद्ध्वस्त
ANI
Published on

नवी दिल्ली : बांगलादेश आणि दिल्ली-एनसीआर क्षेत्रात चालविण्यात येणाऱ्या अवयव प्रत्यारोपण रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून याप्रकरणी दिल्लीस्थित डॉक्टरसह सहा जणांना अटक केली आहे, असे मंगळवारी पोलिसांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून या प्रकरणाचा गुप्तपणे माग घेतला. तेव्हा बहुसंख्य देणगीदार आणि लाभार्थी हे बांगलादेशातून बनावट दस्तऐवजांच्या सहाय्याने शस्त्रक्रियेसाठी भारतात आल्याचे आढळले.

दिल्लीतील एका नामांकित रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यचिकित्सक म्हणून काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरने बांगलादेशातून आलेल्या काही जणांवर २०२१ ते २०२३ या कालावधीत अनेक शस्त्रक्रिया केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नोएडास्थित खासगी रुग्णालयात ही महिला डॉक्टर सल्लागार म्हणून काम करीत होती आणि तेथेच तिने या शस्त्रक्रिया केल्या होत्या.

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा जणांमध्ये डॉक्टरांचा एक सहाय्यक आणि बांगलादेशातील तीन नागरिकांसह अन्य चार जणांचा समावेशआहे. गेल्या दोन आठवड्यांपासून हे अटकसत्र सुरू आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in