पंजाबममध्ये २४ फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट बंदी

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार पटियाला, संगरूर आणि फतेहगढ साहिबसह पंजाबमधील काही जिल्ह्यांतील काही भागात इंटरनेट सेवा बंद
पंजाबममध्ये २४ फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट बंदी

चंदिगड : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार पटियाला, संगरूर आणि फतेहगढ साहिबसह पंजाबमधील काही जिल्ह्यांतील काही भागात इंटरनेट सेवा बंदी २४ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चाच्या पार्श्वभूमीवर १२ ते १६ फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. मंत्रालयाच्या १६ फेब्रुवारीच्या आदेशानुसार, पटियालामधील शंभू, जुलकन, पासियन, पाटण, शतरणा, सामना, घनौर, देवीगड आणि बलभेरा पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणाऱ्या भागात इंटरनेट सेवा बंद राहतील. मोहालीतील लालरू पोलीस ठाणे; भटिंडा येथील संगत पोलीस ठाणे, मुक्तसरमधील किल्लियांवली पोलीस ठाणे; मानसातील सरदुलगढ आणि बोहा पोलीस ठाणे आणि संगरूरमधील खानौरी, मूनक, लेहरा, सुनम आणि चाजली पोलीस ठाणे व फतेहगढ साहिब पोलीस ठाण्यांतर्गत असलेले क्षेत्र येथील या इंटरनेट सेवा बंद राहतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in