तब्बल हजार कोटींच्या घोटाळ्यात गोविंदाची चौकशी ;कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

ऑनलाईन पाँझी घोटाळ्यात ओदिशा गुन्हे शाखेने गोविंदाचे नाव चौकशीसाठी घेतले आहे
तब्बल हजार कोटींच्या घोटाळ्यात गोविंदाची चौकशी ;कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

भुवनेश्वर : हिरो नंबर वन अर्थात गोविंदा याची ओदिशा पोलिसांकडून तब्बल १००० कोटींच्या आर्थिक घोटाळ्यासंबंधी चौकशी होणार आहे. ओदिशा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. १००० कोटी रुपयांच्या ऑनलाईन पाँझी घोटाळ्यासंदर्भात अभिनेता गोविंदाची चौकशी केली जाणार आहे. सोलर टेक्नो अलायन्सने (एसटीए-टोकन) अनेक देशांमध्ये बेकायदेशीरपणे क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली ऑनलाईन पाँझी घोटाळा केला. या कंपनीचे गोविंदाने कथितरीत्या प्रमोशन व समर्थन केले होते. दरम्यान, कंपनीच्या ओदिशातील दोन कर्मचाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

ऑनलाईन पाँझी घोटाळ्यात ओदिशा गुन्हे शाखेने गोविंदाचे नाव चौकशीसाठी घेतले आहे. अभिनेत्याने काही प्रमोशनल व्हिडीओंमध्ये कंपनीचे प्रमोशन केले होते. ईओडब्ल्यूचे महानिरीक्षक जे एन पंकज यांनी याबाबत माहिती दिली. जुलैमध्ये गोव्यात एसटीएच्या भव्य समारंभात सहभागी झालेल्या आणि काही व्हिडीओंमध्ये कंपनीची जाहिरात करणाऱ्या फिल्मस्टार गोविंदाची चौकशी करण्यासाठी आम्ही लवकरच एक टीम मुंबईला पाठवू, असे ते म्हणाले आहेत. या प्रकरणात गोविंदा संशयित किंवा आरोपी नाही. त्याची नेमकी भूमिका तपासानंतरच स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले आहे. जर आम्हाला तपासात आढळले की, त्याची भूमिका त्यांच्या व्यावसायिक करारानुसार केवळ उत्पादनाच्या जाहिरातीपुरती मर्यादित होती, तर आम्ही त्याला आमच्या खटल्यात साक्षीदार बनवू,” असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या कंपनीने भद्रक, केओंझार, बालासोर, मयूरभंज आणि भुवनेश्वरमधील १० हजार लोकांकडून तब्बल ३० कोटी रुपये गोळा केल्याची माहिती आहे. उपलब्ध माहितीनुसार, या घोटाळ्यांतर्गत कंपनीने बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, झारखंड आणि इतर राज्यांतील गुंतवणूकदारांकडून लाखो रुपये घेतले. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीचे देश आणि ओदिशा प्रमुख गुरतेज सिंग सिद्धू आणि नीरोद दास यांना ७ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. भुवनेश्वरस्थित गुंतवणूक सल्लागार रत्नाकर पलाई यांना १६ ऑगस्ट रोजी सिद्धूशी संबंध असल्याबद्दल अटक करण्यात आली होती. कंपनीचे प्रमुख डेव्हिड गेझ या हंगेरियन नागरिकाविरुद्ध लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती.

कंपनीचे दोन कर्मचारी अटकेत

आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने कंपनीचे भारतातील आणि ओदिशातील प्रमुख गुरतेज सिंग सिंधु आणि नेरोद दास यांना अनुक्रमे ७ ऑगस्ट व १६ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. तसेच भुवनेश्वर येथील गुंतवणूक सल्लागार रत्नाकर पलार्इ याला देखील अटक करण्यात आली आहे. त्याचा गुरुतेज सिंगशी थेट संबध प्रस्थापित झाला आहे.

कंपनीच्या प्रमोशनल व्हिडीओत सहभाग

आर्थिक गुन्हे शाखेचे महासंचालक जे. एन. पंकज म्हणाले आहेत की, या प्रकरणात गोविंदा संशयित किंवा आरोपी नाही. त्याची नेमकी भूमिका तपासानंतरच स्पष्ट होईल, त्याची भूमिका त्यांच्या व्यावसायिक करारानुसार केवळ उत्पादनाच्या जाहिरातीपुरती मर्यादित असल्यास त्याला आमच्या खटल्यात साक्षीदार बनवू.

logo
marathi.freepressjournal.in