रिअल इस्टेटमधील गुंतवणूक वाढेल: डोमनिक रोमेल

स्थिर रेपो दरांमुळे घर खरेदीदार आणि विकासकांसाठी कर्जावरील स्थिर व्याजदर मिळतील
रिअल इस्टेटमधील गुंतवणूक वाढेल: डोमनिक रोमेल

मुंबई : रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवल्याबद्दल आम्ही आरबीआयचे आभार मानतो. संतुलित अंतरिम अर्थसंकल्पानंतरची ही चांगली वाटचाल आहे. रेपो दर अपरिवर्तित ठेवण्याच्या निर्णयाने उद्योग आणि बाजाराच्या भावनांचा विचार केला आहे. हे सातत्य रिअल इस्टेट क्षेत्रातील आत्मविश्वास वाढवते, गुंतवणूक आणि वाढीला चालना देते. स्थिर रेपो दरांमुळे घर खरेदीदार आणि विकासकांसाठी कर्जावरील स्थिर व्याजदर मिळतील, ज्यामुळे हप्ता अधिक वाजवी राहील. याचा नक्कीच परवडणाऱ्या घरांवर सकारात्मक परिणाम होतो आणि बाजाराला लवचिक आणि भरभराट ठेवत रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये आणखी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल. आम्हाला आशा आहे की यामुळे एमएमआरमधील मालमत्तेची मागणी वाढेल, अशी प्रतिक्रिया एमएमआरच्या रिअल इस्टेट उद्योगाची सर्वोच्च संस्थेवर क्रेडाई-एमसीएचआईचे अध्यक्ष डोमनिक रोमेल यांनी आरबीआयच्या पतधोरणावर दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in